IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, आयपीएल सुरु होण्याआधी स्टार सलामीवीर जखमी; होऊ शकतो संपूर्ण हंगामातून बाहेर..

IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, आयपीएल सुरु होण्याआधी स्टार सलामीवीर जखमी; होऊ शकतो संपूर्ण हंगामातून बाहेर..

IPL 2024: आयपीएलचा नवा मोसम सुरू होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे. आणि त्याआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा फटका बसू शकतो. संघाचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे. आयपीएल 2024 चा पहिला सामना 22 मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा  (CSK vs RCB)संघ आमनेसामने येणार आहे.  चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 चे विजेतेपद पटकावले होते, त्यानंतर आता CSK संघ पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपदाचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

IPL 2024: डेव्हन कॉनवे अंगठ्याच्या दुखापतीमुळे सुरवातीचे काही सामने बाहेर.

ऑस्ट्रेलियासोबत खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे जखमी झाला होता. क्षेत्ररक्षण करताना कॉनवेच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला टी-20 मालिकेतील एका सामन्यातून आणि कसोटी मालिकेतूनही बाहेर व्हावे लागले. आता आयपीएल लेटेस्ट न्यूजनुसार आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा हा किवी फलंदाज अंगठ्याच्या शस्त्रक्रियेमुळे आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेरपडला आहे. जो चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.

IPL 2024: चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का, आयपीएल सुरु होण्याआधी स्टार सलामीवीर जखमी; होऊ शकतो संपूर्ण हंगामातून बाहेर..

चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीच्या क्रमातील डेव्हॉन कॉनवे हा महत्त्वाचा दुवा मानला जातो. कॉनवेचा सध्याचा फॉर्मही चांगला आहे, त्यामुळे त्याला सुरुवातीच्या सामन्यांमधून वगळणे सीएसकेसाठी मोठा धक्का ठरू शकतो. चेन्नई सुपर किंग्जचे सराव शिबिरही गेल्या आठवड्यात सुरू झाले आहे. आता हळूहळू सीएसकेचे उर्वरित खेळाडूही या सराव शिबिरात सहभागी होणार आहेत.

ड्वेन कॉनवेचे आयपीएल 2023 खूपच नेत्रदीपक होते. गेल्या मोसमात डेव्हॉन कॉनवेने सीएसकेला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएल 2023 मध्ये कॉनवेने 51.69 च्या सरासरीने 672 धावा केल्या. या काळात त्याने 6 अर्धशतके झळकावली.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

– IPL 2024: हे तीन दिग्गज खेळाडू आहेत धोनीच्या कर्णधारपदाचे चाहते, जाणून घ्या सविस्तर.– BCCI Central Contract 2024: रिंकू सिंग, रजत पाटीदार यांच्यासह अनेक नवीन आणि युवा खेळाडूंना संधी, परंतु या दिग्गज अनुभवी खेळाडूंची हकालपट्टी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *