IPL 2024 CSK vs RCB Live updates: चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. होय, यावेळी चेन्नईची कमान महेंद्रसिंग धोनीच्या हातात नसून रुतुराज गायकवाडच्या हाती आहे. दुसरीकडे, आरसीबी यावेळी नव्या नावाने स्पर्धेत उतरणार आहे. पहिला सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे रात्री 8 वाजता होणार आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेतील विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे.
IPL 2024 CSK vs RCB Live updates: वाचा क्षणोक्षणीचे अपडेट लाइव्ह
-
. 18:44 (IST) 22 मार्च 2024
CSK vs RCB: उद्घाटन समारंभात अक्षय-टायगरची जादू पाहायला मिळाली
IPL 2024 च्या उद्घाटन समारंभात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी आपली जादू दाखवली. या दोघांनीही आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. दोघांनी आपल्या अनेक गाण्यावर ताल धरत आयपीएलच्या धमाकेदार ओपनिंग सोहळ्याला सुरवात केली.
-
16:59 (IST) 22 मार्च 2024
CSK vs RCB: एका बाजूला नवीन कर्णधार, तर दुसरीकडे नवीन नाव.
आयपीएल 2024 मध्ये एकीकडे चेन्नई सुपर किंग्स नवीन कर्णधार रुतुराज गायकवाडसोबत मैदानात उतरणार आहे, तर दुसरीकडे आरसीबी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या नव्या नावाने मैदानात उतरणार आहे.
-
16:15 (IST) 22 मार्च 2024
CSK vs RCB: सामना रात्री 8 वाजता सुरू होईल
आयपीएल 2024 आजपासून सुरू होत आहे. चेपॉक येथील स्टेडियमवर चाहत्यांना CSK आणि RCB यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना रात्री 8वाजतापासून सुरु होणार आहे. त्याआधी चेन्नईच्या मैदानावर भव्य असा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
==
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
- ट्रॉफी जिंकल्यानंतर स्मृती मानधनाच्या गळ्यात हात टाकून सोबत फोटो काढणारा तरूण कोण? सोशल मिडीयावर फोटो होतायेत तुफान व्हायरल..
- IPL RECORDS: आयपीएल मधील हे अविश्वसनीय विक्रम मोडणे जवळपास अशक्यच,कोणत्याही स्टार खेळाडूला सुद्धा जमणार नाही अशी कामगिरी..!