IPL 2024: अवघ्या 29 चेंडू मध्ये शतक ठोकणारा ‘हा’ खेळाडू दिल्ली कॅपिटलचे बदलणार नशीब ? संघाला जिंकून देणार ट्रॉफी?

IPL 2024: अवघ्या 29 चेंडू मध्ये शतक ठोकणारा 'हा' खेळाडू दिल्ली कॅपिटलचे बदलणार नशीब ? संघाला जिंकून देणार ट्रॉफी?

IPL 2024: आयपीएल 2024 सुरवात होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक बाकी आहेत. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने एक नवी चाल खेळली आहे. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीच्या जागेवर एका विस्फोटक फलंदाजाला संघात सामील करून घेतले आहे. हा तो फलंदाज आहे ज्याने ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडला आहे.

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील 'हे' नवे खेळाडू कोणत्याही संघाला देऊ शकतात जबरदस्त टक्कर!

नुकतेच या फलंदाजाने अवघ्या 29 चेंडू मध्ये शतक ठोकून जागतिक क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम रचला आहे. ख्रिस गेल आणि ए बी डिव्हिलियर्ससारख्या फलंदाजाचा विक्रम मोडीत काढणाऱ्या या खेळाडूचे नाव आहे ‘जेक फ्रेजर मॅकगर्क’.

IPL 2024: जेक फ्रेजर मॅकगर्क बदलणार दिल्लीचे नशीब?

आयपीएल 2024 मध्ये फ्रेजरच्या येण्याने दिल्ली कॅपिटल्सचे नशीब बदलू शकते. फ्रेजरकडे मोठमोठे फटके मारण्याचे ताकद आहे. दिल्ली कॅपिटल्सने फ्रेजरला 50 लाख रुपये देऊन आपल्या संघामध्ये जोडले आहे. अंतिम 11 जणांच्या संघामध्ये त्याला खेळण्यास संधी मिळाली तर तो जबरदस्त कामगिरी करू शकतो.

फ्रेजर याने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक मार्च कप स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने अवघ्या 29 चेंडू मध्ये शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या शतकी खेळीसह त्याने ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला विक्रम उध्वस्त केला.

IPL 2024: अवघ्या 29 चेंडू मध्ये शतक ठोकणारा 'हा' खेळाडू दिल्ली कॅपिटलचे बदलणार नशीब ? संघाला जिंकून देणार ट्रॉफी?

फ्रेझरने स्थानिक क्रिकेट मधील 16 फर्स्ट क्लास मॅचेस मध्ये 550 धावा केल्या होत्या तर लिस्टच्या 21 सामन्यांमध्ये 525 धावा केल्या आहेत. टी ट्वेंटी क्रिकेट मधील 37 सामन्यांमध्ये 133 स्ट्राईकरेटने या फलंदाजाच्या नावावर 645 धावांची नोंद आहे.

जॅक ने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेमध्ये फ्रेशर ने पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना दोन सामन्यात 51 धावा केल्या होत्या. आयपीएल 2024 मध्ये संधी मिळाली तर तो दिल्ली साठी नक्कीच एक सामना विजेता खेळाडू ठरू शकतो..


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *