IPL 2024 GT: हार्दिक पांड्यानंतर आणखी एक स्टार खेळाडू गुजरात सोडण्याच्या मार्गावर? दुसऱ्या संघाकडून मिळालेल्या ऑफरवर गुजरातचे मालक भडकले…

IPL 2024 GT: हार्दिक पांड्यानंतर आणखी एक स्टार खेळाडू गुजरात सोडण्याच्या मार्गावर? दुसऱ्या संघाकडून मिळालेल्या ऑफरवर गुजरातचे मालक भडकले...

IPL 2024 GT: आयपीएल 2024  (Indian Premier League) साठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. IPL 2024 साठी खेळाडूंना सोडण्याची आणि कायम ठेवण्याची प्रक्रिया संपली आहे. या काळात काही संघांनी आपापसात खेळाडूंची खरेदी-विक्रीही केली. यामध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्याचे नाव प्रमुख आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला ट्रेडिंग विंडो अंतर्गत विकत घेतले.

त्यानंतर आता गुजरात टायटन्सला आणखी एक मोठा धक्का लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरात चा आणखी एक स्टार खेळाडू विंडो ट्रेड नियमानुसार गुजरात मधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. आणखी एका फ्रँचायझीने मोहम्मद शमीशी व्यापार करण्यासाठी गुजरात टायटन्सशी संपर्क साधला.

IPL 2024 GT: हार्दिक पांड्यानंतर आणखी एक स्टार खेळाडू गुजरात सोडण्याच्या मार्गावर? दुसऱ्या संघाकडून मिळालेल्या ऑफरवर गुजरातचे मालक भडकले...

 IPL 2024: गुजरात टायटन्सचे सीईओ यांनी केला मोठा खुलासा..

गुजरात टायटन्सचे सीईओ कर्नल अरविंदर सिंग यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली. गुजरात टायटन्सच्या सीईओला जेव्हा विचारण्यात आले की शमीच्या (मोहम्मद शमी) व्यापाराची बातमी खरी आहे का?

त्यानंतर ते म्हणाले की, “हे खरे आहे की आयपीएल संघाच्या एका अधिकाऱ्याने त्याच्या कोचिंग स्टाफशी संपर्क साधला होता. मात्र ही पद्धत योग्य नसल्याने संघ व्यवस्थापनही याबाबत नाराज आहे.

अरविंदर सिंग पुढे म्हणाले,

“आयपीएल व्यापाराबाबत बीसीसीआयचे नियम स्पष्ट आहेत. पण या आयपीएल संघाच्या अधिकाऱ्याने आमच्याशी बोलले नाही आणि कोचिंग स्टाफशी संपर्क साधला. जर त्याला बोलायचे असते तर त्याने ते समोर केले असते, परंतु कोचिंग स्टाफशी बोलण्यात काही अर्थ नाही. ”

IPL 2024 GT: हार्दिक पांड्यानंतर आणखी एक स्टार खेळाडू गुजरात सोडण्याच्या मार्गावर? दुसऱ्या संघाकडून मिळालेल्या ऑफरवर गुजरातचे मालक भडकले...

त्यामुळे नक्कीच आम्ही त्यांच्या या वर्तवनुकीवर नाराज आहोत.

हार्दिक पांड्याला मुंबई सोबत ट्रेड करण्याबद्दल ही त्यांनी केला खुलासा.

हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्स सोडण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की,

“आम्ही हार्दिकच्या निर्णयाचा आदर करतो आणि आम्हाला त्याच्याबद्दल नेहमीच आदर राहील. आता शुभमन गिल गुजरातचे कर्णधार असेल. त्याला कर्णधार बनवण्यापूर्वी त्याचे मत घेण्यात आले होते आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर तो खूश होता.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *