IPL 2024: मुंबई इंडियन्सवर जसप्रीत बूमराह नाराज? इंस्टावरील स्टोरीने चर्चांना उधान, समोर आले मोठे कारण…

IPL 2024:  आयपीएल 2024 चा मिनी  लिलाव जसजसा जवळ येत आहे तसा तसा मुंबई इंडियन्समधील  चर्चा समोर येत आहेत. सध्या  स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यानंतर संघात सर्वकाही चुकीचे होताना दिसत आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला आणण्यात मुंबई इंडियन्स फ्रँचायझी यशस्वी ठरली. पंड्या दोन हंगामांनंतर एमआयमध्ये सामील झाला आहे आणि आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माच्या संघात खेळताना दिसणार आहे. हार्दिकने मुंबई संघात प्रवेश केल्यानंतर एक नवीन बातमी पसरत आहे. पंड्याचे सहकारी मुंबई फ्रँचायझीवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

IPL 2024: हार्दिक पंड्याच्या येण्याने जसप्रीत बूमराह नाराज.

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ही स्टोरी  पोस्ट केली आणि लिहिले, “कधीकधी मौन हे सर्वोत्तम उत्तर असते.” लोक बुमराहच्या अलीकडील इंस्टाग्राम स्टोरीला हार्दिकच्या मुंबई इंडियन्समध्ये परत येण्याशी जोडत आहेत.

 

याशिवाय असे सांगण्यात येत आहे की, बुमराहने इंस्टाग्राम आणि एक्स (ट्विटर) वर मुंबई इंडियन्सचे अकाउंट अनफॉलो केले आहे. कर्णधार रोहित शर्माला हार्दिकच्या मुंबई इंडियन्समध्ये समावेश करण्याबाबत विचारण्यात आले नसल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही. मुंबई इंडियन्सचा भावी कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याकडे पहिले जात आहे. मात्र त्याला संघात घेण्याआधी रोहित शर्माला विचारलेही नसल्याचे बोलले जात आहे.

IPL 2024: हार्दिक पांड्या असणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार?

पुढील हंगामात आणि आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्या कर्णधार असेल की नाही ? याबाबत कोणतीही अधिकृत बातमी नाही. हार्दिकने मागील दोन आयपीएल हंगामात गुजरातचे नेतृत्व केले होते, जिथे त्याने गुजरात संघाला (GT)  पदार्पणाच्या हंगामात चॅम्पियन बनला होता आणि पुढच्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचला होता.

IPL 2024: मुंबई इंडियन्सवर जसप्रीत बूमराह नाराज? इंस्टावरील स्टोरीने चर्चांना उधान, समोर आले मोठे कारण...

आता हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्ससाठी कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. शिवाय पुढील हंगामात मुंबईचा कर्णधार पंड्या की रोहित ? याकडे ही क्रिकेट चाहत्याने लक्ष लागले आहे..


हेही वाचा:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *