गोलंदाजास एक काळ बनून राहणाऱ्या ‘या’ खेळाडूंमुळे शाहरुख खानचा केकेआर संघ विजयाची हॅट्ट्रिक साधणार? आयपीएल 2024 मध्ये घालणार धुमाकूळ..!

ipl 2024 kkr star player list

IPL 2024 (आयपीएल 2024) , KKR: जगातील सर्वांत मोठी टी-२० स्पर्धा आयपीएल 2024 (IPL 2024) ला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामामध्ये 10 संघ सहभागी होणार असून प्रत्येक जण ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आसुसलेला आहे. लीग मधील दोन संघ असे आहेत जे की या विजय षटकार मरण्याच्या इरादयाने मैदानात उतरतील तर दुसरीकडे बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा केकेआर (KKR) संघ हा विजयाची हॅट्ट्रिक करण्यावर नजरा ठेवून आहे. केकेआरच्या संघाला यंदाचा विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

गोलंदाजास एक काळ बनून राहणाऱ्या 'या' खेळाडूंमुळे शाहरुख खानचा केकेआर संघ विजयाची हॅट्ट्रिक साधणार? आयपीएल 2024 मध्ये घालणार धुमाकूळ..!

आयपीएल 2024 आधी गौतम गंभीरची केकेआरच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड

केकेआर ला दोनदा ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा ‘गौतम गंभीर’ हा या संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळत आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये या संघाला एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. यंदा या संघाच्या नेतृत्वाची धुरा श्रेयश अय्यर सांभाळत आहे. केकेआरने यंदाच्या वर्षी आपल्या संघामध्ये अनेक मॅच विनर खेळाडू घेतले आहेत त्यामुळे या संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

आक्रमक फलंदाज नितेश राणा, श्रेयश अय्यर, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, वरूण चक्रवर्ती सारखे मॅच विनर खेळाडू या संघात खेळत आहेत. जे की कोणत्याही क्षणी सामन्याचा नूर आपल्या बाजूने पलटू शकतात. केकेआर कडे अजून असे दोन खेळाडू आहेत जे इतर नव संघाला कोणत्याही क्षणी भारी पडू शकतात.

रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल हे कोणत्याही गोलंदाजास एक काळ बनून राहिल्यासारखे आहेत. त्यांची बॅट चालली तर, ते संघाला जिंकूनच दम घेतात. रिंकू सिंग हा आयपीएल मध्ये 2018 पासून खेळतोय, मात्र त्याच्या बॅटचा जलवा हा मागील वर्षीच्या आयपीएल मध्ये सर्वांना पाहायला मिळाला. मागील वर्षी गुजरात टायटन्स विरोध खेळताना यश दयालच्या एका षटकात पाच षटकार ठोकून केकेआरला रोमहर्षक सामन्यात विजय मिळवून दिला.

IPL 2024 Schedule: अखेर आयपीएल 2024 चे वेळापत्रक समोर, आयपीएल दरम्यान होणार लोकसभेच्या निवडणुका? संभ्रम कायम..

आयपीएलच्या 31 सामन्यात 29 डावांमध्ये 36 च्या सरासरीने त्याने 725 धावा केल्या आहेत. त्याच्या धमाकेदार कामगिरीनंतर त्याला टीम इंडियाच्या टी20 संघामध्ये स्थान देण्यात आले. टीम इंडियाकडून त्याने 15 टी 20 सामन्यामधील 11 डावात 7 वेळा नाबाद रहात 356 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 176 पेक्षा अधिक आहे.

वेस्टइंडीजचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल याची ओळख क्रिकेट जगताला करून द्यायची गरज नाही. कारण त्याच्या नावातच एक मोठा धाक आहे. आयपीएलमध्ये खेळण्याचा त्याला प्रचंड अनुभव आहे. त्याने केकेआरला अनेक हरलेल्या सामन्यांमध्ये जिंकून दिले आहेत. या अष्टपैलू खेळाडूने आयपीएलमध्ये 112 सामने खेळलेले असून त्यात त्याच्या नावावर 2,262 धावांची नोंद आहे. त्याचा स्ट्राईक रेट 174 आहे.

रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल या दोघांनाही गोलंदाजी करणे म्हणजे गोलंदाजासाठी एक वाईट स्वप्न पाहिल्यासारखे आहे. विशेष म्हणजे दोघेही सध्या जबरदस्त फॉर्मत आहेत. आयपीएल मध्ये त्यांच्या कामगिरीत सातत्य राहिले तर ते केकेआरला विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाही.

  • आयपीएल 2024 साठी केकेआर चा संघ :

ipl 2024 kkr star player list

श्रेयस अय्यर (कर्णधार),चेतन सकारिया, मिचेल स्टार्क , अंगकृष रघुवंशी, रमनदीप सिंह, शेरफेन रदरफोर्ड, नितीश राणा, रिंकू सिंह, रहमानुल्लाह गुरबाज, फिल सॉल्ट , सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, के.एस. भरत, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गस एटकिंसन, साकिब हुसैन.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हे ही वाचा:- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण, तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.

IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *