IPL 2024: आयपीएल 2024 चा 17वा हंगाम सुरु होण्यासाठी आता केवळ एक महिना बाकी आहे. सर्वच संघ आपपली तयारी करत असतांना काही संघाना मात्र हंगामाच्या सुरवातीलाच अनेक धक्के बसत आहेत. असंच काहीसं झालंय आयपीएल मधील फ्रेन्चायझी लखनऊ सुपर जायंट्स ( lSG) सोबत.
आयपीएलच्या मिनी लिलावात 7:30 कोटी रुपयांची बोली लावून संघात सामील करून घेतलेला खेळाडू आता या हंगामात खेळणार नाहीये. त्याच्या जागी आता संघाने दुसऱ्या खेळाडूचे नाव जाहीर केले आहे. लखनऊ सुपर जायंट्स ( lSG) ने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मार्क वुडच्या जागी एका खेळाडूची घोषणा केली आहे.
आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी एलएसजीने वेस्ट इंडिज संघाच्या 24 वर्षीय युवा वेगवान गोलंदाजावर विश्वास दाखवला आहे. नक्की कोण आहेत ते जाणून घेऊया सविस्तर.
IPL 2024: वैयक्तिक दुखापतीच्या कारणामुळे मार्क वूड पडला संपूर्ण हंगामातून बाहेर..
आयपीएल 2022 च्या लिलावात एलएसजीने मार्क वुडला 7.50 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट केले होते. मात्र, कोपराच्या दुखापतीमुळे तो या मोसमात खेळू शकला नाही, तर गेल्या मोसमात खेळलेल्या चार सामन्यांत त्याने 11.82 च्या सरासरीने एकूण 11 बळी घेतले.
🚨LSG name Shamar Joseph as replacement for Mark Wood.#IPL2024 #Markwood #shamarjoseph pic.twitter.com/KckYWklT1w
— CRICGLOBE (@thecricglobe) February 10, 2024
IPL 2024: मार्क वुडच्या जागी एलएसजीने या गोलंदाजाची निवड केली. (shamer joseph Replace mark wood in Ipl 2024)
लखनऊ सुपर जायंट्सने मार्क वुडच्या जागी कॅरेबियन संघाचा उगवता स्टार शमर जोसेफवर विश्वास व्यक्त केला आहे. टीमने त्याला 3 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन आपल्यात आणले आहे.
तसेच, जोसेफने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गाबा येथे झालेल्या या कसोटी सामन्यात जोसेफने ७ विकेट घेत वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 1997 नंतर ऑस्ट्रेलियातील कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा हा पहिला विजय ठरला.
त्यामुळे शमर जोसेफचा हा पहिलाच आयपीएल हंगाम असणार आहे. आगामी मोसमात तो कशी कामगिरी करणार हे पाहण्यासारखे असेल.
शमर जोसेफच्या क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर (shamer joseph Cricket Career)
शमर जोसेफच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, आत्तापर्यंत तो वेस्ट इंडीजच्या राष्ट्रीय संघासाठी केवळ 2 कसोटी सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 17.31 च्या सरासरीने एकूण 13 विकेट घेतल्या आहेत. तसेच, शमर जोसेफने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव्ह स्मिथची विकेट घेतली होती.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता