IPL 2024: सध्या एकीकडे भारतात विश्वचषक 2023 अंतिम टप्यात पोहचला आहे तर दुसरीकडे इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या तयारीला ही वेग आला आहे. आयपीएलच्या संघांनी परस्पर संमतीने नियमांचा वापर करून खेळाडू बदलण्यास सुरवात देखील केली आहे. याचाच एक हिस्सा म्हणून लखनौ सुपर जायंट्सकडून मुंबई इंडियन्सला एक चांगला खेळाडू मिळाला आहे.
आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी वेस्ट इंडिजचा स्टार वेगवान गोलंदाज रोमॅरियो शेफर्डला मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सकडून विकत घेतले आहे. शेफर्डने मागच्या हंगामात 4 आयपीएल सामने खेळले आहेत. तो लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. आता मुंबईने त्याला 50 लाख रुपयांमध्ये आपल्या संघाचा भाग बनवले आहे. आयपीएल च्या ऑफीशियल वेबसाईटनुसार यंदाच्या आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबरला दुबईत होण्याची शक्यता आहे.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, आयपीएल फ्रँचायझींना ते ज्या खेळाडूंना कायम ठेवतील आणि 15 नोव्हेंबरपर्यंत सोडतील त्यांची यादी सादर करावी लागेल. यानंतर आयपीएल 2024 च्या लिलावासाठी खेळाडूंची यादी तयार केली जाईल.
𝘠𝘦 𝘩𝘢𝘪 मुंबई 𝘔𝘦𝘳𝘪 𝘑𝘢𝘢𝘯 ✨🥹💙#OneFamily #MumbaiIndians #MumbaiMeriJaan pic.twitter.com/sW07P5aTOn
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2023
आयपीएल 2024 चा मिनी लिलाव कधी होणार?
BCCI ने अद्याप IPL 2024 च्या लिलावाची अंतिम तारीख जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा पहिला विदेशी लिलाव असेल. यंदाच्या लिलावात प्रत्येक संघाकडे 100 कोटी रुपयांची पर्स असेल.( कायम केलेले खेळाडू सोडून उरलेली रक्कम लिलावात वापरता येणार)
मिनी लिलावासाठी पंजाब किंग्जकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक आहे. त्याच्या पर्समध्ये 12.20 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये सर्वात कमी रक्कम (0.5 कोटी) शिल्लक आहे.
IPL 2024 मिनी लिलावासाठी कोणाच्या पर्समध्ये किती कोटी शिल्लक?
मुंबई इंडियन्स – ०.५ कोटी
सनरायझर्स हैदराबाद – 6.55 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – 1.75 कोटी
राजस्थान रॉयल्स – 3.35 कोटी
चेन्नई सुपर किंग्ज – 1.5 कोटी
गुजरात टायटन्स – 4.45 कोटी
दिल्ली कॅपिटल्स – 4.45 कोटी
लखनौ सुपर जायंट्स – 3.55 कोटी
कोलकाता नाइट रायडर्स – 1.16 कोटी
हेही वाचा: