IPL 2024 Mini Auction: विश्वचषकात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ 3 खेळाडूंवर होणार पैश्याची उधळण, एकजण तर होऊ शकतो आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू..
IPL 2024 Mini Auction: विश्वचषक २०२३ आता शेवटच्या टप्प्यात आहे, स्पर्धेला अंतिम फेरीतील एक संघ मिळाला आहे. होय, भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आता IPL 2024 मध्ये खूप फायदा होणार आहे. फ्रँचायझी आयपीएल लिलावात काही खेळाडूंवर खूप पैसा खर्च करू शकतात. या यादीत अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
IPL 2024 Mini Auction: मिनी लिलावात या खेळाडूंवर पडेल पैशांचा पाऊस..
1. रचिन रवींद्र (Rachin Ravindra)
न्यूझीलंडचा 23 वर्षीय डावखुरा युवा फलंदाज रचिन रवींद्र आपला पहिला विश्वचषक खेळत आहे आणि त्याच्याकडे पाहून कोणीही म्हणू शकत नाही की हा त्याचा पहिलाच विश्वचषक आहे. रचिनने आपल्या आतापर्यंतच्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. त्यानंतर आता आयपीएल 2024 साठी अनेक फ्रँचायझी त्याच्याकडे लक्ष देत आहेत. उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत होऊन न्यूझीलंड संघ विश्वचषकातून बाहेर पडला असला तरी या खेळाडूने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. रचिनने पहिल्याच विश्वचषकात तीन शानदार शतके झळकावली. या स्पर्धेत रचिनने आपल्या बॅटने 550 हून अधिक धावा केल्या आहेत.
2. डॅरिल मिशेल (Daryl Mitchell )
न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज डॅरिल मिशेलने २०२३ चा विश्वचषक शानदार खेळला. उपांत्य फेरीत त्याचा संघ हरला असला तरी या सामन्यात मिशेलने शेवटपर्यंत झुंज दिली. मिचेलने या सामन्यात 123 धावांची खेळी केली. त्याने या स्पर्धेत आपल्या बॅटने 552 धावा केल्या.
यादरम्यान त्याने 2 शानदार शतके झळकावली. विशेष म्हणजे त्याने टीम इंडियासमोर दोन्ही शतके झळकावली आहेत. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा फायदा आयपीएल 2024 मध्ये होऊ शकतो. अनेक फ्रँचायझी त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी करोडो रुपये खर्च करू शकतात.
3. अजमतुल्ला उमरझाई (Azmatullah Omarzai )
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत संपूर्ण अफगाणिस्तान संघाने चाहत्यांना खूप प्रभावित केले असले तरी या संघातील एक खेळाडू असा आहे ज्याने फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत चमकदार कामगिरी करून आयपीएल फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेतले आहे. विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धेत प्रथमच अफगाणिस्तान संघाने 4 सामने जिंकून विश्वविजेत्या संघांना पराभूत केले आहे.
ज्यामध्ये अजमतुल्ला उमरझाईने महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्याने या स्पर्धेत आपल्या बॅटने 353 धावा केल्या आहेत. ही गोलंदाजी करताना त्याने 7 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
आयपीएल 2024 चा मिनी लीलाव डिसेंबरमध्ये पार पडणार आहे. या लिलावात प्रत्येक संघाकडे जवळपास 25/30 कोटी रक्कम शिल्लक असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या मिनी लिलावात आता कोणता संघ कोणत्या खेळाडूवर सर्वांत मोठी बोली लावतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे..
हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..