IPL 2024 Mini Auction: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच होतंय असं काही, तब्बल एवढ्या खेळाडूंनी ठेवलीय 2 कोटी बेस प्राईज..

IPL 2024 Mini Auction: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच होतंय असं काही, तब्बल एवढ्या खेळाडूंनी ठेवलीय 2 कोटी बेस प्राईज..

IPL 2024 Mini Auction :  इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) पूर्वी लिलावाची तारीख आणि ठिकाण अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे. आयपीएल लिलावापूर्वी ट्रेडिंग विंडोमध्ये खेळाडूंची बरीच देवाणघेवाण होते. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा लिलाव परदेशात होणार आहे. या लिलावासाठी एकूण 1166 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. जाणून घ्या हा लिलाव कुठे आणि कधी होणार आहे.

IPL 2024 Mini Auction: विश्वचषकात धुमाकूळ घालणाऱ्या 'या' 4 खेळाडूंवर होणार पैश्याची उधळण, एकजण तर होऊ शकतो आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू..

१९ डिसेंबरला दुबईत लिलाव होणार आहे. हा एक छोटा लिलाव असल्याने तो एका दिवसात घेतला जाईल. यंदाच्या लिलावात असे मोठे खेळाडू आहेत, त्यांना खरेदी करण्यात कोणते संघ यशस्वी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यंदाच्या लिलावात 61 खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत कोटींमध्ये ठेवली आहे. यापैकी 25 खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि स्टार फलंदाज रॅसी व्हॅन डर डुसेन यांचाही 2 कोटी रुपयांच्या करारात समावेश आहे. जगातील अव्वल फिरकीपटूंपैकी एक असलेल्या वानिंदू हसरंगाची किंमत दीड कोटी रुपये आहे. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सोडले आहे. चला तर जाणून घेऊया नक्की कोणत्या खेळाडूची किती आहे प्राईज.

IPL 2024 Mini Auction: 2 कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू:

हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, शॉन अॅबॉट, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजूर रहमान, टॉम बॅंटन, हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, जेराल्ड कोएत्झी, रिले रॉसौ, रॅसी व्हॅन डर डुसेन, अँजेलो मॅथ्यूज.

IPL 2024 Mini Auction: 1.5 कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू:

मोहम्मद नबी, मॉइसेस हेन्रिक्स, ख्रिस लिन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, डॅनियल वॉरॉल, टॉम कुरन, मर्चंट डी लँग, ख्रिस जॉर्डन, डेविड मलान, टायमल मिल्स, फिल सॉल्ट, कोरी अँडरसन, कॉलिन मुनरो, जिमी नीशम, टीम साउदी, कॉलिन इंग्राम, वानिंदू हसरंगा, जेसन होल्डर, शेरफेन रदरफोर्ड.

IPL 2024 Mini Auction: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच होतंय असं काही, तब्बल एवढ्या खेळाडूंनी ठेवलीय 2 कोटी बेस प्राईज..

IPL 2024 Mini Auction: 1 कोटी रुपये मूळ किंमत असलेले खेळाडू:

अॅश्टन अगर, रिले मेरेडिथ, डी’आर्सी शॉर्ट, अॅश्टन टर्नर, गस ऍटकिन्सन, सॅम बिलिंग्स, मायकेल ब्रेसवेल, मार्टिन गुप्टिल, काइल जेम्सन, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, अल्झारी जोसेफ, रोव्हमन पॉवेल, डेव्हिड व्हीजे.

यांशिवाय एका कोटीपेक्षा कमी मुळ किंमत असणारे देखील बरेच खेळाडू या लिलावात सहभागी झाले आहेत. त्यांत मुख्यता युवा भारतीय खेळाडूंचा मोठा समावेश आहे. आता  या लिलावात कोणाचे भाग्य चमकणार आणि कोण सर्वांत महागडा खेळाडू ठरणार, हे येत्या 19 डिसेंबरलाच कळेल..


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *