IPL 2024 mini auction players list: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) लिलावात एकूण 333 खेळाडू 77 जागांसाठी स्पर्धा करणार आहेत, ज्यात भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव, हर्षल पटेल आणि शार्दुल ठाकूर यांचाही समावेश आहे.
2 कोटी रुपयांच्या सर्वोच्च आधारभूत किमतीच्या श्रेणीत या भारतीय खेळाडूंना ठेवण्यात आले आहेत. हर्षलला दोन वर्षांपूर्वी आयपीएल लिलावात 10.75 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. आता या लिलावात हर्षल पटेलवर किती बोली लागते हे पाहणे रंजकदार असेल.
IPL 2024 mini auction players list: 214 भारतीय आणि 119 परदेशी खेळाडूंचा लिलावयादीमध्ये समावेश.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने 1166 खेळाडूंची यादी फ्रँचायझींना सादर केली होती. फ्रँचायझीच्या सल्ल्यानंतर या खेळाडूंची संख्या 333 झाली. यामध्ये २१४ भारतीय आणि ११९ विदेशी खेळाडू आहेत. या लिलावात 116 कॅप्ड आणि 215 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश असेल. दोन खेळाडू सहयोगी देशांचेही आहेत. या लिलावात सर्व 10 फ्रँचायझी एकूण 262.95 कोटी रुपये खर्च करू शकतात. तर उपलब्ध 77 जागांपैकी 30 जागा ह्या विदेशी खेळाडूंसाठी आहेत.
IPL 2024 mini auction players list: लिलाव यादीमध्ये या मोठ्या नावांचा समावेश.
या लिलावाच्या यादीत अनेक मोठ्या नावांचाही समावेश आहे. या क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पडू शकतो. यापैकी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना जास्त मागणी असण्याची अपेक्षा आहे, कारण विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्स, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम नायक ट्रॅव्हिस हेड, यष्टिरक्षक जोश इंग्लिश आणि स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना 2 कोटी रुपयांच्या आधारभूत किंमत श्रेणीत ठेवण्यात आले आहे. .
IPL 2024 mini auction players list:सर्वच फ्रँचायझीचे या खेळाडूंवर लक्ष .
न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रचाही समावेश अशा खेळाडूंमध्ये आहे ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये, वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि फलंदाज रॅसी व्हॅन डर डुसेन फ्रँचायझीचे लक्ष वेधून घेऊ शकतात. काही अनोळखी खेळाडू फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वीही होऊ शकतात. यामध्ये इंग्लंडच्या टॉम कोहलर कॅडमोरचा समावेश आहे, ज्याची मूळ किंमत 40 लाख रुपये आहे. हा यष्टीरक्षक फलंदाज त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो.
श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये आहे. त्याच्याशिवाय श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकालाही चांगली किंमत मिळू शकते. भारतीय जलदगती गोलंदाज शिवम मावी, कार्तिक त्यागी आणि कमलेश नागरकोटी, जे मुख्यतः आयपीएलमध्ये खेळतात, यांना 20 ते 30 लाख रुपयांच्या आधारभूत किंमत श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे.
IPL 2024 mini auction franchise Purse in Cr : प्रत्येक संघाकडे किती पर्स आहे ?
गुजरात टायटन्स (GT) – 38.15 कोटी
सनरायझर्स हैदराबाद (SRH) – 34 कोटी
कोलकाता नाइट रायडर्स (KKR) – 32.7 कोटी
चेन्नई सुपर किंग्स (CSK) – 31.4 कोटी रुपये
पंजाब किंग्स (PBKS) – 29.1 कोटी
दिल्ली कॅपिटल्स (DC) – २८.९५ कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) – २३.२५ कोटी
मुंबई इंडियन्स (MI) – 17.75 कोटी
राजस्थान रॉयल्स (RR) – 14.5 कोटी
लखनौ सुपर जायंट्स (LSG) – 13.15 कोटी
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..