‘पांड्याच्या जाण्याने काय फरक पडत नाही..’ गुजरात सोडून गेलेल्या हार्दिक पांड्याबाबत संघातील दिग्गज खेळाडूचे मोठे वक्तव्य, म्हणाला….

'पांड्याच्या जाण्याने काय फरक पडत नाही..' गुजरात सोडून गेलेल्या हार्दिक पांड्याबाबत संघातील दिग्गज खेळाडूचे मोठे वक्तव्य, म्हणाला....

IPL 2024:  भारतीय क्रिकेट संघ आणि गुजरात टायटन्सचा (GT) स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohmmad Shami) त्याचा सहकारी अष्टपैलू हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) ताशेरे ओढले आहेत. हार्दिकने गुजरात टायटन्स सोडले आणि आयपीएल (IPL-2024) च्या पुढील हंगामापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. आता तर मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही तो सांभाळणार आहे. पण त्याच्याबद्दल मोहम्मद शमीला विचारण्यात आले असता त्याने मोठे वक्तव्य केले आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय म्हणाला मोहम्मद शमी..

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने IPL-2024 कायम ठेवण्यापूर्वीच मोठा निर्णय घेतला आहे. या माजी चॅम्पियनला सोडून तो पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. हार्दिकच्या अनुपस्थितीत युवा खेळाडू शुभमन गिलला गुजरात फ्रँचायझीचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. आता यावर बोलतांना मोहम्मद  शमी म्हणाला की,

‘कोणी संघ सोडला तरी काही फरक पडत नाही,एक संघ म्हणून तुम्ही कधीही एका खेळाडूवर अवलंबून नसता. मुळात क्रिकेट हा खेळच सांघिक कामगिरीवर अवलंबून आहे. त्यामुळे एखादा खेळाडू सोडून गेला तर त्याच्या बदल्यात तुम्हाला त्यासारखी कामगिरी करू शकणार नाही, असा एकही खेळाडू मिळू शकणार नाही असे शक्य नाही. प्रत्येकाची रिप्लेसमेंट नक्कीच असते.’

एकदिवसीय विश्वचषकात चेंडूने सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एका टीव्ही चॅनलला सांगितले की, ‘कोणी गेले तरी कोणाला काही फरक पडत नाही. हार्दिकने फ्रँचायझी सोडल्याची कोणालाच पर्वा नाही. हार्दिकला जायचे होते आणि तो गेला. कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आणि गुजरातने दोनदा अंतिम फेरी गाठली. एकदा आयपीएल ट्रॉफीही जिंकली. आता गुजरातला त्याच्याशिवाय चांगली कामगिरी कशी करता येईलयाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.

'पांड्याच्या जाण्याने काय फरक पडत नाही..' गुजरात सोडून गेलेल्या हार्दिक पांड्याबाबत संघातील दिग्गज खेळाडूचे मोठे वक्तव्य, म्हणाला....

कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची दमदार कामगिरी.

हार्दिक पांड्याच्या जाण्याने पाच वेळा आयपीएल चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्समध्ये बदल झाला आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्या मुंबई संघाची धुरा सांभाळणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्याच सत्रात दमदार कामगिरी करत जेतेपद पटकावले.

हार्दिकने गेल्या मोसमात संघाला आणखी एका अंतिम फेरीत नेले पण यावेळी चेन्नई सुपर किंग्जने त्याचे स्वप्न भंगले. चेन्नईने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आता हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई आणि शुभमनच्या नेतृत्वात गुजरात या हंगामात कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे. IPL 2024 मार्चमधील शेवटच्या आठवड्यापासून सुरु होऊ शकते.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *