IPL 2024: हा हंगाम महेंद्रसिंह धोनीसाठी ठरणार शेवटचा, ‘या’ 3 कारणामुळे धोनी आयपीएल 2024 नंतर घेणार संन्यास..!

IPL 2024: हा हंगाम महेंद्रसिंह धोनीसाठी ठरणार शेवटचा, 'या' 3 कारणामुळे धोनी आयपीएल 2024 नंतर घेणार संन्यास..!

IPL 2024: एमएस धोनी आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामापासून खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे. आतापर्यंत माही आयपीएल २०२४ नंतर आयपीएल खेळेल की नाही याबद्दल शंका आहे मात्र आता स्वतः धोनीने याबद्दल संकेत दिले आहेत. असे मानले जात आहे की, आयपीएल 2024 (IPL 2024)  हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. यामागे तीन कारणे असू शकतात. मात्र, आयपीएल २०२४ नंतर खेळायचे की न खेळायचे याचा निर्णय माही घेणार आहे.

या 3 कारणामुळे महेंद्र सिंह धोनी IPL 2024  नंतर आयपीएलमधून होणार निवृत्त..!

IPL 2024:  हा हंगाम महेंद्रसिंह धोनीसाठी ठरणार शेवटचा, 'या' 3 कारणामुळे धोनी आयपीएल 2024 नंतर घेणार संन्यास..!

1.एमएस धोनीचे वाढते वय.

एमएस धोनीचे वय सध्या ४२ वर्षे आहे. जुलै 2024 मध्ये तो 43 वर्षांचा होईल. पण वयाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही हे त्याने सिद्ध केले आहे. या वयात क्रिकेट खेळणे कोणत्याही खेळाडूसाठी खूप अवघड असते. माही ज्या पद्धतीने विकेट्सच्या दरम्यान धावा काढतो ते पाहून कोणीही म्हणू शकत नाही की माही 42 वर्षांचा आहे. पण त्याचे वय लक्षात घेता आयपीएल 2024 हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो.

 

2.शस्त्रक्रियेनंतरमैदानावर पुनरागमन.

आयपीएल 2023 च्या फायनलनंतर एमएस धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. धोनीच्या गुडघ्यावर २९ मे रोजी शस्त्रक्रिया झाली होती. पण या शस्त्रक्रियेनंतर माही चेन्नई संघाला आपले 100 टक्के देऊ शकेल का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या शस्त्रक्रियेनंतर धोनीला मैदानात परतणे सोपे नसेल. अशा परिस्थितीत त्याच्या शस्त्रक्रियेनंतरची ही त्याची शेवटची आयपीएल असू शकते.

IPL 2024: हा हंगाम महेंद्रसिंह धोनीसाठी ठरणार शेवटचा, 'या' 3 कारणामुळे धोनी आयपीएल 2024 नंतर घेणार संन्यास..!

3.एमएस धोनी मैदानाबाहेर खूप व्यस्त

एमएस धोनी मैदानाबाहेर खूप व्यस्त असतो. माही भारतीय लष्कराशी देखील संबंधित आहे. आयपीएलला अलविदा केल्यानंतर धोनी लष्करातही काम करू शकतो, असेही बोलले जात आहे. धोनीला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते. त्याच्या शेतात काम करतानाही तो अनेकदा दिसला आहे. या तीन कारणांमुळे माही आयपीएल 2024 नंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in | All Rights Reserved.

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

IPL 2024: नीता अंबानीने घेतला मोठा निर्णय… ना रोहित शर्मा ना हार्दिक पांड्या, हा खेळाडू सांभाळणार आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *