IPL 2024 RCB vs RR: IPL 2024 मध्ये, 22 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. या मोसमात आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली होती.
पहिल्या 8 सामन्यात संघाला फक्त एकच सामना जिंकता आला होता पण संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली प्रत्येक सामन्यात शानदार फलंदाजी करत होता. विराट हा आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे आणि त्याच्या डोक्यावर ऑरेंज केपं आहे. आता एलिमिनेटर सामन्यात कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.
IPL 2024 Play off, RCB vs RR: कोहली IPLच्या 8000 धावा पूर्ण करणार!
विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे. कोहलीने अनेक वर्षे संघाचे नेतृत्वही केले आहे. आयपीएलच्या इतिहासात कोहलीने आतापर्यंत 251 सामन्यांच्या 243 डावांमध्ये 7971 धावा केल्या आहेत.
सध्या कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहली आता त्याच्या 8 हजार आयपीएल धावा पूर्ण करण्यापासून 29 धावा दूर आहे. एलिमिनेटर सामन्यात कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २९ धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये ८ हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.
आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला आयपीएलमध्ये ही कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 8 शतके आणि 50 अर्धशतके केली आहेत. याशिवाय नाबाद ११३ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आयपीएलच्या इतिहासात कोहलीने 702 चौकार आणि 271 षटकार मारले आहेत.
First Indian to have completed in T20 Cricket history:
7000 runs – Virat Kohli.
8000 runs – Virat Kohli.
9000 runs – Virat Kohli.
10000 runs – Virat Kohli.
11000 runs – Virat Kohli.
12000 runs – Virat Kohli.– King Kohli, The GOAT. 🐐 pic.twitter.com/BYGB6XRfnj
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 22, 2024
कोहलीची आयपीएल 2024 मधील कामगिरी.
IPL 2024 मध्ये कोहलीच्या बॅटला आग लागली आहे. या मोसमात कोहलीनेही शतक झळकावले आहे. आतापर्यंत 14 सामन्यांत कोहलीने 155 च्या स्ट्राईक रेटने 708 धावा केल्या आहेत. या कालावधीत कोहलीने 59 चौकार आणि 37 षटकार मारले आहेत. आता एलिमिनेटर सामन्यात कोहलीकडून संघाला अशाच शानदार कामगिरीची अपेक्षा असेल.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता