IPL 2024 Playoff Match Schedule: आयपीएल 2024 चा 70 वा सामना पावसात वाहून गेल्याने, प्लेऑफमधील चार संघांपैकी कोणता संघ कोणत्या स्थानी राहील हे निच्छित झाले आहे,विवारी, 19 मे रोजी, हंगामातील शेवटच्या दुहेरी हेडरमध्ये, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी लढत झाली, ज्यामध्ये पॅट कमिन्सच्या संघाने विजय मिळविला आणि दुसरे स्थान काबीज केले. तर राजस्थानला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यासह क्वालिफायर आणि एलिमिनेटरमध्ये कोणते संघ भाग घेणार हे निश्चित झाले.
केकेआर आणि हैद्राबाद अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असल्यामुळे ते डायरेक्ट अंतिम सामन्यांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खेळतील. तर. तिसऱ्या क्रमांकावर असलेला राजस्थान संघ आरसीबीसोबत सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दोन हात करेल.
रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह सनरायझर्सचे 17 गुण झाले आणि राजस्थान रॉयल्सच्या पुढे 16 गुण होते. मात्र, राजस्थानकडे एक संधी शिल्लक होती. गुवाहाटीमध्ये, नंबर-1 संघ कोलकाता नाईट रायडर्सचा सामना होणार होता, परंतु पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही आणि दोन्ही संघांमध्ये 1-1 गुणांची वाटणी झाली परंतु राजस्थानचे 17 गुण होते दर, सनरायझर्सला दुसरे स्थान मिळाले.
असे होणार प्ले ऑफचे सामने (IPL 2024 Playoff Match Schedule)
आता गुणतालिकेची अंतिम क्रमवारी समोर आली आहे आणि या आधारावर प्रथम पात्रता आणि एलिमिनेटरची क्रमवारी देखील निश्चित करण्यात आली आहे. पहिला क्वालिफायर सामना पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये खेळवला जाईल. कोलकाता आणि सनरायझर्स यांच्यातील हा सामना मंगळवार 21 मे रोजी होणार आहे.
तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेले राजस्थान आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने येतील. हा सामना बुधवार 22 मे रोजी होणार आहे. या दोन्ही सामन्यांचे ठिकाण अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आहे.
IPL 2024 Playoff Details पहिल्या आणी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला मिळणार दोन संधी .
पहिले आणि दुसरे स्थान मिळवण्याचा फायदा म्हणजे दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी मिळतात. नियमांनुसार, पहिला क्वालिफायर जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचतो. म्हणजे कोलकाता आणि सनरायझर्स यांच्यात जो जिंकेल तो अंतिम फेरीत पोहोचेल. पराभूत संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश करेल. येथे त्याचा सामना एलिमिनेटरच्या विजेत्याशी होईल. म्हणजे राजस्थान आणि बेंगळुरूमध्ये जो हरेल तो बाहेर जाईल, तर विजयी संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचेल.
येथे त्याचा सामना पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाशी होईल. हा सामना शुक्रवार 24 मे रोजी चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. येथील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल.
अंतिम सामना 26 मे रोजी चेपॉकमध्येच खेळवला जाईल. आता हे पाहायचे आहे की, कोलकाता 10 वर्षांनंतर तिसऱ्यांदा चॅम्पियन होतो का? की सनरायझर्स आपले दुसरे विजेतेपद जिंकण्यात यशस्वी होईल? पहिला आयपीएल चॅम्पियन राजस्थान 2008 पासून सुरू असलेला दुष्काळ संपवू शकेल का? की सलग 6 पराभवानंतर 6 विजय नोंदवून प्लेऑफमध्ये पोहोचलेला बेंगळुरू 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच चॅम्पियन बनू शकेल? त्याचा निर्णय आठवडाभरानंतर घेतला जाईल.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.