IPL 2024 Points Table: सनरायजर्स हैद्राबादच्या जिंकण्याने पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, मुंबई इंडियन्स प्ले ऑफमधून बाहेर तर या 3 संघावर ही टांगती तलवार..!

0
2
IPL 2024 Points Table: सनरायजर्स हैद्राबादच्या जिंकण्याने पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, मुंबई इंडियन्स प्ले ऑफमधून बाहेर तर या 3 संघावर ही टांगती तलवार..!

IPL 2024 Points Table:  IPL चा 56 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात खेळला गेला. हैदराबादने हा सामना 10 विकेटने जिंकला. ज्यानंतर SRH ने IPL 2024 पॉइंट्स टेबलमध्ये प्लेऑफसाठी पात्र होण्याचा आपला दावा मजबूत केला तर या सामन्यातील पराभवानंतर लखनौ संघासाठी शर्यतीत कायम राहणे आव्हानात्मक बनले आहे. SRH विरुद्ध LSG सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्येनक्की काय बदलझाले आणि कोणत्या संघाला याचा फायदा तर कोणत्या संघाला याचे नुकसान झाले यावर एक नजर टाकूया..

IPL 2024 Points Table: सनरायजर्स हैद्राबादच्या जिंकण्याने पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, मुंबई इंडियन्स प्ले ऑफमधून बाहेर तर या 3 संघावर ही टांगती तलवार..!

IPL 2024 Points Table:   हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून एक पाउल दूर..!

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात खेळलेला हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा होता. कारण, दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी विजय अत्यंत महत्त्वाचा होता.
लखनौला हरवून हैदराबादने आपले काम सोपे केले आहे. SRH चे गुणतालिकेत (IPL 2024 Points Table) 11 सामन्यांतून 16 गुण आहेत. यासह संघ आता  तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यासह चेन्नईने सुपर किंग्सला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. या सामन्यानंतर CSK ने 1 स्थान गमावले आहे. चेन्नईची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

राजस्थान 16 गुणांसह पहिल्या स्थानावर तर KKR 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हे दोन्ही संघ पात्र ठरण्याच्या शर्यतीत प्रबळ दावेदार वाटत आहेत.

IPL 2024 Points Table: सनरायजर्स हैद्राबादच्या जिंकण्याने पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, मुंबई इंडियन्स प्ले ऑफमधून बाहेर तर या 3 संघावर ही टांगती तलवार..!

IPL 2024 Points Table: लखनौसाठी स्पर्धा वाढली..!

प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या संघांच्या शर्यतीत लखनौचा संघ कायम आहे. लखनौ, सीएसके, हैदराबाद आणि दिल्ली या संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. पण, हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर एलएसजीचा तणाव वाढताना दिसत आहे. केएल राहुलचे अजून २ सामने बाकी आहेत. ज्याला कोणत्याही किंमतीवर जिंकावे लागेल तरच प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 16 गुण होतील.

एकही सामना गमावल्यास एलएसजीचे स्वप्न भंगू शकते. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना १६ गुणांसह उत्तम  रणरेट देखील राखणे गरजेच आहे. आता वरीलपैकी कोणते 4 संघ आयपीएल च्या उपांत्य सामन्यात प्रवेश मिळवू शकतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here