IPL 2024: भारतात सध्या एकीकडे विश्वचषक 2023 अंतिम चरणावर आला आहे तर दुसरीकडे इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या मिनी लिलावाची लागभाग सुरु झाली आहे. बीसीसीआयने सर्वच संघाना आपण कायम केलेले व करारमुक्त केलेले असे सर्व खेळाडूंची यादी 26 नोव्हेंबर पर्यंत जमा करण्यास सांगितले आहे. त्यानंतर 15 डिसेंबरपर्यंत या सर्व खेळाडूंना आपापले नावे लिलावात दाखल करण्याची अनुमती असेल. आयपीएल 2024 चा मिनी लिलाव यंदा 19 डिसेंबर ला पार पडणार आहे.
IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला केले करारमुक्त.
Prithvi Shaw released by Delhi Capitals ahead of IPL 2024.
— Himanshu Pareek (@Sports_Himanshu) November 11, 2023
आपण कायम ठेवलेले आणि रिलीज केलेले खेळाडूंची सर्व यादी संघांना 26 नोव्हेंबर पर्यंत बीसीसीआय चेअरमन कडे जमा करायची आहे. त्याआधी आयपीएल मध्ये फ्रेन्चायझी दिल्ली कॅपिटल्स (DC) ने पृथ्वी शॉला संघातून रीलीज केले आहे. यामागे त्याची मागच्या दोन हंगामातील कामगिरी देखील जबाबदार आहे.
पृथ्वी शॉ वर संघ मालक निराश होते , कारण त्याने आयपीएलच्या शेवटच्या दोन मोसमात प्रभाव पाडण्यासाठी संघर्ष केला. 2023 च्या मोसमात आठ सामन्यांत फक्त 106 धावा आणि 2022 च्या सत्रात 10 सामन्यांमध्ये 283 धावा केल्या.
IPL 2023: 2023 च्या आयपीएल हंगामातील अपयशानंतर, पृथ्वी शॉला स्पर्धेच्या मध्यभागी संघ व्यवस्थापनाने वगळले होते.
पृथ्वी शॉला अलीकडेच फॉर्ममध्ये घसरणीचा सामना करावा लागला आहे, परंतु शक्तिशाली शॉट्स देण्याची आणि आक्रमक सुरुवात करण्याची त्याची निर्विवाद क्षमता त्याला आयपीएल 2024 मिनी लिलाव जवळ येत असताना एक लोकप्रिय खेळाडू बनवते. मात्र गेल्या अनेक दिवसापासून तो चर्चेतून बाहेर आहे.
आणि त्याचे वाढते वजन,फिटनेस याकडे असलेले दुर्लक्ष पाहून या मिनी लिलावात पृथ्वी वर कोणता संघ बोली लावण्यास उत्सुक असेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..