IPL 2024: संघातील तिन्ही महत्वाच्या गोलंदाजांना आरसीबीने केले बाहेर, संघात फक्त कागदी घोडे; मिनी लिलावात या खेळाडूंवर असेल नजर..

IPL 2024: संघातील तिन्ही महत्वाच्या गोलंदाजांना आरसीबीने केले बाहेर, संघात फक्त कागदी घोडे; मिनी लिलावात या खेळाडूंवर असेल नजर..

IPL 2024: IPL 2024 पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने काही खेळाडूंना सोडले आहे. रविवारी, फ्रँचायझीने सोडलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला सादर केली. यामध्ये तीन खेळाडूंच्या नावांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हे आरसीबीचे महत्त्वाचे खेळाडू होते ज्यांना आता फ्रँचायझीने सोडले आहे.

रविवारी, IPL 2024 मध्ये सहभागी झालेल्या 10 संघांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर केली. त्यापैकी एकूण 173 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले तर 89 खेळाडूंना सोडण्यात आले. आता 19 डिसेंबरला होणाऱ्या मिनी लिलावाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

Virat Kohli RCB | Virat Kohli the captain will be happier than the batsman:  Irfan Pathan on RCB's campaign in IPL 2021 | Cricket News

IPL 2024 :आरसीबीने तीन महत्त्वाच्या गोलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) तीन महत्त्वाच्या खेळाडूंना सोडून सर्वांनाच चकित केले. यामध्ये हर्षल पटेल, वनिंदू हसरंगा आणि जोश हेजलवूड यांच्या नावांचा समावेश आहे. हे तिघेही आरसीबीच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक होते.

हर्षल पटेलने आयपीएलच्या एका मोसमात आरसीबीकडून खेळताना पर्पल कॅपही जिंकली आहे. मात्र गेल्या दोन मोसमातील त्याची कामगिरी प्रश्नचिन्हाखाली राहिली. यामुळेच आता त्याची सुटका करण्यात आली आहे.

हर्षल पटेल, वोनिंदू हसरंगा आणि जोश हेझलवूड यांच्या जागी कोणत्या खेळाडूंना आरसीबीचा भाग बनवता येईल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

IPL 2024 :हर्षल, पटेल हसरंगा आणि हेजलवूडची जागा कोण घेणार?

वोनिंदू हसरंगाच्या जागी श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू डुनिथ वेललागेचा संघात समावेश करण्याचा संघ व्यवस्थापन विचार करत असल्याची माहिती आहे. फिरकी गोलंदाजीसोबतच हा खेळाडू खालच्या क्रमवारीतही स्फोटक फलंदाजी करू शकतो.हसरंगाच्या जागी दुनिथ संघासाठी योग्य बदली ठरेल. त्याचबरोबर हर्षल पटेलच्या जागी शार्दुल ठाकूरला आरसीबी संघात स्थान मिळू शकते. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी सोडले.

IPL 2024: संघातील तिन्ही महत्वाच्या गोलंदाजांना आरसीबीने केले बाहेर, संघात फक्त कागदी घोडे; मिनी लिलावात या खेळाडूंवर असेल नजर..

याशिवाय जोश हेजलवूडच्या जागी मिचेल स्टार्कला आरसीबी मोठी बोली लावून संघात सामील करून घेऊ शकते. स्टार्क यापूर्वीही आरसीबीकडून खेळला आहे. या तीन गोलंदाजांच्या उपस्थितीत, RCB आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकण्याचा दावा करू शकते.

आता मिनी लिलावात वरीलपैकी कोणत्या खेळाडूना संघात घेण्यात आरसीबी ला यश मिळते, हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *