आयपीएल 2024 च्या मिनी लीलावाआधी आरसीबी करणार ‘या’ 3 खेळाडूंची हकालपट्टी, मागच्या सीजनमध्ये एकानेही नाही केलीय चांगली कामगिरी..

आयपीएल 2024

आयपीएल 2024 : IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. याआधी सर्व संघ त्यांच्या सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला देतील. यावर्षीच्या लीलावाधी असे मानले जातंय की जवळजवळ सर्व संघ त्यांच्या काही मोठ्या खेळाडूंना सोडू शकतात, त्यापैकी एक जो त्यांच्या संघात मोठे बदल शोधत असेल तो म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB). सलग तीन वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरल्यानंतरही या संघाला एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाहीये.  आयपीएल 2023 मध्ये देखील संघ बाद फेरीत पोहोचेल अशी अपेक्षा होती मात्र  तसे होऊ शकले नाही याला संघातील खेळाडूंची कामगिरी जबाबदार होती.

आयपीएल 2024 च्या मिनी लीलावाआधी आरसीबी करणार  'या' 3 खेळाडूंची हकालपट्टी, मागच्या सीजनमध्ये एकानेही नाही केलीय  चांगली कामगिरी..

अशा परिस्थितीत बंगळुरू आयपीएल 2024 च्या हंगामात फ्लॉप खेळाडूंना सोडवून नवीन खेळाडू जोडू शकते. या विशेष लेखामध्ये जाणून घेऊया कोणते असे खेळाडू आहेत जे यंदाच्या आयपीएलआधी आरसीबी सोडू शकते.

 

आयपीएल 2024 :  मिली लिलावाआधी या 3खेळाडूंना आरसीबी करणार रिलीज..

सिद्धार्थ कौल

या यादीत पहिले नाव सिद्धार्थ कौलचे आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) IPL 2024 च्या लिलावाच्या आधी सिद्धार्थ कौलला सोडू शकते. कौलने आयपीएल 2022 मध्ये फक्त एकच सामना खेळला आणि त्याला आयपीएल 2023 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अश्या रीतीने सिद्धार्थ मागचे दोन हंगाम केवळ बेंच गरम करण्याचे काम करतोय.

जर आपण त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोललो तर त्याने 55 आयपीएल सामन्यांमध्ये 58 विकेट घेतल्या आहेत आणि आयपीएल 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी त्याची सर्वोत्तम कामगिरी झाली, जेव्हा त्याने 17 सामने खेळले आणि 21 विकेट घेतल्या. पण तेव्हापासून कौल आयपीएलमध्ये अनेक फ्रँचायझींसोबत खेळत आहे.

हर्षल पटेल

आयपीएल 2024 च्या मिनी लीलावाआधी आरसीबी करणार  'या' 3 खेळाडूंची हकालपट्टी, मागच्या सीजनमध्ये एकानेही नाही केलीय  चांगली कामगिरी..
आयपीएल 2024 च्या लिलावाआंधी आणखी एक खेळाडू आहे ज्याला आरसीबी सोडू शकते तो म्हणजे हर्षल पटेल. त्याचे कारण म्हणजे त्याची खराब गोलंदाजी. त्याच्या गोलंदाजीची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे वेगवान गोलंदाजासाठी त्याचा इकॉनॉमी रेट खूपच खराब आहे. अशा परिस्थितीत आता संघ त्याला सोडू शकतो.

आयपीएल 2021 हा त्याचा ब्लॉकबस्टर होता ज्यामध्ये त्याने 32 विकेट घेतल्या होत्या. आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा हर्षल पटेल पुढील दोन आवृत्त्यांमध्ये केवळ 19 आणि 14 विकेट्स घेऊ शकला आहे.

दिनेश कार्तिक

या यादीमध्ये तिसरा खेळाडू आहे ज्याला RCB सोडू शकते तो म्हणजे दिनेश कार्तिक. एबी डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर, दिनेश कार्तिकचा आयपीएल 2022 पूर्वी संघात समावेश करण्यात आला होता आणि त्याने या फ्रँचायझीसाठी फिनिशरची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावली आहे.

आयपीएल 2022 मध्ये त्याने आरसीबीसाठी 330 धावा केल्या होत्या. तथापि, आयपीएल 2023 मध्ये, कार्तिकला मागील आवृत्तीच्या तुलनेत अर्ध्याही धावा करता आल्या नाहीत. IPL 2023 मध्ये, RCB च्या यष्टिरक्षकाने 11.67 च्या सरासरीने 140 धावा केल्या. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याच्या यष्टिरक्षणानेही संघाची निराशा केली. ज्यामुळे त्याच्यावर संघ नाराज आहे.

आयपीएल 2024

येत्या लिलावात जर एखादा चांगला विकेटकीपर फिनिशर उपलब्ध असेल तर  त्याला संघात जोडण्यासाठी आरसीबी नक्कीच दिनेश कार्तिकला करारमुक्त करू शकते..

 

तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटत आरसीबीवरील पैकी कोणत्या खेळाडूला संघातून काढून टाकेल, आणि  यावर्षी तरी आरसीबी आयपीएलची पहिली ट्रॉफी जिंकेल का? कमेंट करून नक्की सांगा.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *