IPL 2024: ऋषभ पंतच्या आयपीएल खेळण्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा, केवळ एवढेच सामने खेळू शकतो पंत.

IPL 2024: ऋषभ पंतच्या आयपीएल खेळण्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा, केवळ एवढेच सामने खेळू शकतो पंत.

IPL 2024: टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला आतापर्यंत क्रिकेटपासून दूर राहावे लागले आहे. आयपीएल 2024 लवकरच सुरु होणार आहे.  ऋषभ पंत आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी कठोर मेहनत करतांना दिसत आहे. ऋषभ सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सतत अपडेट्स देत असतो. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी ऋषभ पंतच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

ऋषभ पंतच्या आयपीएल खेळण्यावर रिकी पाँटिंगने केला मोठा खुलासा.

IPL 2024: ऋषभ पंतच्या आयपीएल खेळण्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा, केवळ एवढेच सामने खेळू शकतो पंत.

ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळताना दिसत असल्याच्या बातम्या मीडियामध्ये आहेत. ऋषभ पंतचे चाहते त्याच्या पुनरागमनाच्या पुष्टी वृत्ताची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.

आयपीएल लेटेस्ट  न्यूजशी  बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला,

‘ऋषभला खात्री आहे की तो खेळू शकेल. पण ती कोणत्या भूमिकेसाठी असेल याबाबत आम्हाला खात्री नाही. तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल. तो सक्रिय आहे आणि चांगले चालत आहे.

रिकी पाँटिंग पुढे म्हणाला,

‘आम्ही पहिल्या सामन्यापासून फक्त सहा आठवडे दूर आहोत. त्यामुळे तो विकेटकीपिंग करू शकेल की नाही याची खात्री नाही. पण जेव्हा मी त्याला विचारले तेव्हा तो एवढाच बोलला की, मी प्रत्येक सामना खेळेन, कीपिंग करेन आणि नंबर 4 वर फलंदाजी करेन. तो तसाच आहे, तो खूप डायनॅमिक खेळाडू आहे. तो स्पष्टपणे आमचा कर्णधार आहे. गेल्या वर्षी आम्हाला त्याची खूप आठवण आली.

IPL 2024: ऋषभ पंतच्या आयपीएल खेळण्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक रिकी पाँटिंगचा मोठा खुलासा, केवळ एवढेच सामने खेळू शकतो पंत.

ऋषभ पंत आयपीएल 2024 मिनी ऑक्शनमध्ये टीमसोबत दिसला होता. पुनरागमन करण्यासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सतत प्रशिक्षण घेत आहे. रिकी पॉन्टिंग पुढे म्हणाला की, जर तो सर्व सामन्यांमध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त नसेल, तर फ्रँचायझी त्याला 14 पैकी 10 सामने किंवा कितीही सामन्यांसाठी संघात आणू शकते, तर ते बोनसपेक्षा कमी नसेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *