IPL 2024 : आयपीएल 2024 आता हळूहळू अंतिम आठवड्याकडे वाटचाल करत आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा यावर्षीचा पहिला संघ मुंबई इंडियन्स ठरला आहे. हैद्राबादने काल लखनौचा 10 विकेट्सने पराभव करताच मुंबई इंडियन्स अधिकृत रित्या प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर पडली आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने रोहित शर्माबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने सांगितले की, हिटमॅन पुढच्या हंगामातमुंबई इंडियन्स सोडेल. खरे तर या हंगामापूर्वीच संघ व्यवस्थापनाने अनुभवी खेळाडूला कर्णधारपदावरून हटवून संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवली होती. या मोसमात मुंबईची कामगिरी काही विशेष झाली नाही. 12 पैकी आठ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IPL 2024:मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर.
गुणतालिकेत मुंबई इंडियन्स आठ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. बुधवारी हैदराबादने लखनौचा पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान मजबूत केले आणि मुंबईला बाहेर काढले. एक संघ जास्तीत जास्त 12 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. मुंबईचा नेट रन रेटही खूपच कमी आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी 12 गुण पुरेसे नाहीत. एमआयला त्यांच्या सहाव्या आयपीएल विजेतेपदासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2020 मध्ये त्याने पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली.
माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदातील फेरबदलावर चिंता व्यक्त केली आहे. पुढील हंगामात रोहित एमआयचा भाग राहणार नसल्याचा दावा त्याने केला आहे. रोहितने कोलकाता नाईट रायडर्सचा भाग व्हावा, अशी इच्छा अक्रमने व्यक्त केली आहे.
अक्रम म्हणाला,
“मला वाटतं की तो मुंबई इंडियन्समध्ये पुढच्या मोसमात नसेल. मला त्याला कोलकाता नाईट रायडर्समध्ये पाहायला आवडेल. कल्पना करा गौतम गंभीर मार्गदर्शक असेल, श्रेयस अय्यर कर्णधार असेल. रोहित शर्मा तिथे सलामी देईल. त्यांच्याकडे आहे. खूप मजबूत फलंदाजी करतो तो त्याच्या घरच्या मैदानावर खूप चांगला खेळाडू आहे, पण त्याला कोलकात्यात पाहणे चांगले होईल.
या मोसमात रोहितच्या कामगिरीवर नजर टाकली तर ,त्याने 12 सामन्यांत 152.77 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या आहेत. चालू मोसमातही त्याने आपल्या बॅटने शतक झळकावले आहे. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये तो विकेटवर टिकून राहण्यासाठी धडपडताना दिसत आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.