IPL 2024: या दिवसापासून सुरु होणार आयपीएलचा महासंग्राम, ठिकाण, वेळ, तारीखबद्दल समोर आले मोठे अपडेट्स..

IPL 2024: या दिवसापासून सुरु होणार आयपीएलचा महासंग्राम, ठिकाण, वेळ, तारीखबद्दल समोर आले मोठे अपडेट्स..

IPL 2024 Schedule:  IPL च्या 17 व्या आवृत्तीचा लिलाव, केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग, 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. या लिलावाच्या एक दिवस आधी, स्पर्धेच्या सुरुवातीची तारीख आणि अंतिम सामन्याशी संबंधित एक अहवाल समोर आला आहे. आयपीएल लेटेस्ट न्यूजच्या या अहवालानुसार, आयपीएल 2024 मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊ शकते.

IPL 2024: IPL 17 कधी सुरू होईल?

IPL 2024 Tital Sponsor

IND vs SA 2ND ODI: दुसरा एकदिवशीय सामना आज, रिंकू सिंगला मिळणार पदार्पणाची संधी? पहा असा असू शकतो अंतिम 11 खेळाडूंचा भारतीय संघ..

लिलावापूर्वी, क्रिकबझने अहवाल दिला की आयपीएल 2024 22 मार्चपासून सुरू होऊ शकते. तर अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटी खेळवला जाऊ शकतो. मात्र, ही अद्याप अंतिम तारीख नाही. आयपीएल 17 च्या स्थळावरही सस्पेन्स आहे. कारण देशात लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. अशा परिस्थितीत ही स्पर्धा कोठे आयोजित केली जाईल, याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

IPL 2024:प्रथमच परदेशात आयपीएलचा लिलाव…

आयपीएल 2024 साठी पहिल्यांदाच परदेशात लिलाव होणार आहे. हा लिलाव आज (१९ डिसेंबर) रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे होणार आहे. या लिलावासाठी 333 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. तर यापैकी जास्तीत जास्त 77 बोलींचीच पुष्टी केली जाईल. यापूर्वी 2008 ते 2023 या कालावधीत कोणत्याही हंगामासाठी परदेशात लिलाव झाले नव्हते. त्यामुळे हा लिलाव वेगळा होऊ शकतो.

IPL 2024: या दिवसापासून सुरु होणार आयपीएलचा महासंग्राम, ठिकाण, वेळ, तारीखबद्दल समोर आले मोठे अपडेट्स..

IPL 2024:आयपीएलचा लिलावकर्ताही बदलला

पुरुषांच्या आयपीएल लिलावात महिला लिलावदार खेळाडूंसाठी बोली लावण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. याआधी, तुम्हाला ह्युजेस एडमीड्स आठवत असतील जो अनेकदा खेळाडूंसाठी बोली लावत असत. 2021 मधील 15 व्या हंगामाच्या लिलावादरम्यान तो स्टेजवरही पडला होता. पण यावेळी त्याची जागा मल्लिका सागर घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. मल्लिकाने याआधी दोनदा वुमन्स प्रीमियर लीग (WPL) लिलावात ही भूमिका साकारली आहे. आज पहिल्यांदाच त्या पुरुषांच्या लिलावात पुरुष खेळाडू विकतांना दिसू शकतात

.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *