IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का.. संघाचा स्टार खेळाडू या आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर, समोर आले मोठे कारण..

IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का.. संघाचा स्टार खेळाडू या आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर, समोर आले मोठे कारण..

IPL 2024: भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. तो सध्या हर्नियाच्या समस्येने त्रस्त असून त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान सूर्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार नाही.

IPL 2024 मधून देखील बाहेर पडू शकतो सूर्यकुमार यादव..

अलीकडेच त्याला हर्नियाची समस्या असल्याचे निदान झाले आहे, ज्यामुळे तो आता आयपीएल 2024 चे पहिले काही सामने गमावू शकतो. यादव हा मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा खेळाडू असून तो नेहमीच चांगली कामगिरी करतो. गेल्या मोसमात त्याने 600 हून अधिक धावा केल्या होत्या.

IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का.. संघाचा स्टार खेळाडू या आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर, समोर आले मोठे कारण..

बीसीसीआयच्या एका सूत्राने आयपीएल लेटेस्ट न्यूजला  सांगितले की, “33 वर्षीय सूर्याला नुकतेच हर्निया झाल्याचे निदान झाले आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी, बेंगळुरू येथे त्याच्या दुखापतीवर काम करत आहे. हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी स्काय लवकरच जर्मनीला रवाना होणार आहे. यासोबतच उजव्या हाताचा फलंदाज रणजी ट्रॉफी 2024 मध्ये मुंबईकडून खेळताना दिसणार नाही. याशिवाय  जर सुर्यकुमार यादव लवकर बरा झाला नाही तर तो आयपीएलचा अर्धा हंगाम किंवा जवळपास संपूर्ण हंगामातून बाहेर होऊ शकतो..

या अहवालात पुढे असे म्हटले आहे की, “सूर्याला जूनमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक 2024 साठी तंदुरुस्त होण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल.” यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुललाही गेल्या वर्षी स्पोर्ट्स हर्नियाच्या समस्येशी सामना करावा लागला होता. आणि यामुळे तो काही महिने क्रिकेटपासून दूर राहिला. राहुलची शस्त्रक्रियाही जर्मनीत झाली आणि आता सूर्याही तिथेच जाणार आहे.

IPL 2024: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का.. संघाचा स्टार खेळाडू या आयपीएलमधून होऊ शकतो बाहेर, समोर आले मोठे कारण..

जर आयपीएल 2024 पर्यंत सूर्या पूणर्पणे ठीक झाला नाही तर मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का मानावा लागेल.


हेही वाचा:

“माही सुट्टा मार रहा है..” महेंद्रसिंग धोनी हुक्का पितांनाचा व्हिडीओ तुफान व्हायरल, चाहत्यांना संताप अनावर, पहा व्हायरल व्हिडीओ..

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *