IPL 2024 UPDATE: सूर्यकुमार यादवला लागले दुखापतीचे ‘ग्रहण’, आयपीएलच्या सुरवातीलाच ‘सूर्या’ सामान्यांना मुकणार?

IPL 2024 UPDATE: सूर्यकुमार यादवला लागले दुखापतीचे 'ग्रहण', आयपीएलच्या सुरवातीलाच 'सूर्या' सामान्यांना मुकणार?

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======


IPL 2024 UPDATE: जगातला एक क्रमांकाचा टी20 फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या दुखापतीने त्रस्त आहे. गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तो बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी तो तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय. मात्र तो अद्यापही या दुखापती मधून सावरला नाही. आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळणाऱ्या या खेळाडूला पहिल्या दोन सामन्याला मुकावे लागणार आहे.

IPL 2024 UPDATE: सूर्यकुमार यादवला लागले दुखापतीचे 'ग्रहण', आयपीएलच्या सुरवातीलाच 'सूर्या' सामान्यांना मुकणार?

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना मागील वर्षाचा उपविजेता संघ गुजरात टायटन्स विरुद्ध 24 मार्च रोजी होणार आहे. जागतिक टी ट्वेंटी क्रमवारीतील अव्वल क्रमांकाच्या या खेळाडूने त्याच्या instagram हॅण्डल वर स्ट्रेंथ अँड कंडिशनशी संबंधित व्यायाम करतानाचे काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. मात्र त्याने फलंदाजीचा सराव करतानाचा कोणताही व्हिडिओ पोस्ट केला नाही. म्हणजे तो अद्यापही पूर्णपणे फिट नसल्याचे दिसून येते.

IPL 2024 UPDATE: सूर्यकुमार यादव काही सामन्यातून पडणार बाहेर..

 

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय शी बोलताना सांगितले की, सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरत असून तो निश्चितपणे यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये जोरदार होणारा आगमन करेल. पण अद्याप हे स्पष्ट झाले नाही की, एनसीएच्या मेडिकल टीमने त्याला गुजरात आणि हैदराबाद विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्याला खेळण्यास मंजुरी दिली की नाही. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना सुरू होण्यासाठी अजून 12 दिवसांचा अवधी बाकी आहे. त्याला फिट होण्यासाठी अजून खूप वेळ आहे. त्यापूर्वी तो फिट होईल ही आशा आहे.

सूर्यकुमार यादव याला दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याने मैदानात अद्याप पुर्नआगमन केला नाही. सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन च्या संघात आयपीएल मधील पहिल्या सामन्यात खेळेल अशी चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृतरीत्या दुजोरा मिळाला नाही. पीटीआय ने दिलेल्या माहितीनुसार यादव पहिल्या दोन सामन्याला मुकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

IPL 2024 UPDATE: सूर्यकुमार यादवला लागले दुखापतीचे 'ग्रहण', आयपीएलच्या सुरवातीलाच 'सूर्या' सामान्यांना मुकणार?

सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज असून त्याच्या नावे 60 टी 20आंतरराष्ट्रीय सामन्यात चार शतके खोकल्याची नोंद आहे. त्याने 171च्या स्ट्राईक रेटने 2,141 धावा केल्या आहेत. येत्या जून महिन्यात अमेरिका व वेस्टइंडीज येथे जून महिन्यात सुरू होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये तो भारताला विश्वचषक जिंकून देण्यामध्ये सूर्यकुमार यादवचा खूप मोठा रोल असणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हे ही वाचा:- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण, तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.

IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *