IPL 2024: या 3 कारणामुळे मुंबई इंडियंसचे होताहेत हाल, स्वतः कर्णधार हार्दिक पांड्याचा घमंडीपणा पडतोय भारी..!

IPL 2024: या 3 कारणामुळे मुंबई इंडियंसचे होताहेत हाल, स्वतः कर्णधार हार्दिक पांड्याचा घमंडीपणा पडतोय भारी..!

IPL 2024: मुंबई इंडियन्सला गेल्या रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली एमआयने 8 सामने खेळले आहेत, परंतु आतापर्यंत त्यांना यापैकी केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. या हंगामात फ्रँचायझीने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचा हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला आहे. मुंबईची कमान हाती घेतल्यापासून हार्दिक फॉर्म ऑफ फॉर्ममध्ये दिसला आणि दबावामुळे यशस्वी कर्णधारपदातही अपयशी ठरला.

IPL 2024: या 5 कर्णधारांवर बंदीची टांगती तलवार?, कालच्या सामन्यानंतर हार्दिक पांड्याचाही झाला यादीमध्ये समावेश..!

IPL 2024: हार्दिक पांड्याच्या या 3 चुका ठरल्या पराभवाचे कारण

गेल्या 10 वर्षांपासून मुंबईचे कर्णधार असलेल्या रोहित शर्माने टीमला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आहे. यानंतरही फ्रँचायझीने त्याला रातोरात कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे सोपवले, मात्र या मोसमात त्याला त्याच्या चुकीचे परिणाम भोगावे लागले आहेत. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये एमआयची कामगिरीही सरासरी राहिली आहे.

हार्दिक हा टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु आतापर्यंत तो त्याच्या फलंदाजी किंवा गोलंदाजीने संघाला सपोर्ट करण्यात यशस्वी ठरला नाही. तसेच रोहित शर्मासारखा कर्णधारही त्याला जमलेला नाही. या 3 कारणांमुळे यंदा मुंबई इतर संघांविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात सतत हरत आहे. त्यामुळे हार्दिकची आकडेवारी पाहता एमआयच्या दुरवस्थेला तो जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

IPL 2024:रोहितच्या कर्णधारपदासमोर हार्दिक पांड्या फिका पडला.

रोहित शर्माने 2013 ते 2023 पर्यंत मुंबईचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने संघाला 5 वेळा (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020) आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे. एमआयची सूत्रे हाती घेतल्यापासून रोहितने १५८ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. या काळात त्याने आपल्या कर्णधारपदामुळे मुंबई इंडियन्सला 87 सामन्यांमध्ये नेत्रदीपक विजय मिळवून दिला आहे, तर संघाला 67 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

विशेष म्हणजे मुंबई संघाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने पहिल्याच वर्षी संघाला चॅम्पियन बनवले. त्याचबरोबर कर्णधारपदाच्या बाबतीत हार्दिक पांड्या रोहित शर्माच्या अनेक पावले मागे आहे. दरवर्षी आयपीएल विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जाणारी मुंबई यावेळी इतर संघांच्या तुल्यबळ दिसत आहे.

IPL 2024: या 3 कारणामुळे मुंबई इंडियंसचे होताहेत हाल, स्वतः कर्णधार हार्दिक पांड्याचा घमंडीपणा पडतोय भारी..!

IPL 2024: गेल्या मोसमात हार्दिकची कामगिरी उत्कृष्ट होती

हार्दिक पांड्याच्या आयपीएल कामगिरीवर एक नजर टाकली तर ,तो आतापर्यंत १३१ सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याने आपल्या बॅटने 2460 धावा केल्या आहेत, तर या काळात त्याने 74 डावात 57 विकेट घेत गोलंदाजीद्वारे संघासाठी योगदान दिले आहे. 2022 मध्ये त्याने गुजरात टायटन्सला कर्णधार म्हणून चॅम्पियन बनवले. 2023 साली हार्दिकने आपल्या कर्णधारपदाच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाला फायनलमध्ये नेले, पण संघ विजेतेपदापासून वंचित राहिला.

मात्र आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यापासून हार्दिकची कामगिरी खालावली आहे, ज्याचा परिणाम संपूर्ण संघावर होताना दिसतोय..


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *