IPL 2024 Winner Prediction: सध्या आयपीएल सुरू असून प्लेऑफचे सामनेही पूर्ण झालेले नाहीत. दुसरा क्वालिफायर सामना आज चेन्नईत खेळवला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीत केकेआरसोबत खेळण्याची संधी मिळेल.
अंतिम फेरीचा दुसरा संघ अद्याप निश्चित झालेला नाही, परंतु ऑस्ट्रेलियाचा माजी तुफान गोलंदाज ब्रेट ली याने फायनल खेळणाऱ्या दोन्ही संघांची नावे जाहीर केली आहेत. याशिवाय जेतेपद पटकावणाऱ्या संघाचीही घोषणा केली.
IPL 2024 Winner Prediction: ब्रेटलीच्या मते हा संघ जिंकेल आयपीएल 2024 ट्रॉफी.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ब्रेट ली म्हणाला की, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबाद जिंकेल. हैदराबाद आणि केकेआर यांच्यात अंतिम सामना होणार असून तो केकेआर जिंकणार आहे.
याशिवाय ब्रेट लीने टी-20 विश्वचषकातील भारतीय संघाबाबत उत्तर दिले. ब्रेट ली म्हणाला की,
चार फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांचा विचार करून काही फायदा होत नाही. सर्वप्रथम तुम्ही कुठे खेळत आहात आणि परिस्थिती कशी आहे हे पाहावे. त्यानुसार संघाच्या अकरा जणांची निवड करावी लागेल..
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला असला तरी ,आता संघात बदल केले जाऊ शकतात. संघांमध्ये बदल करण्यासाठी आयसीसीने 25 मे ही अंतिम मुदत दिली आहे. आता भारतीय संघात बदल होणार की नाही हे पाहणे बाकी आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:-