IPL 2025: lSG च्या कर्णधारपदावरून केएल राहुलची हकालपट्टी तय, ‘या’ 3 खेळाडूंपैकी एकजण होणार नवा कर्णधार..!

0
8
IPL 2025: lSG च्या कर्णधारपदावरून केएल राहुलची हकालपट्टी तय, 'या' 3 खेळाडूंपैकी एकजण होणार नवा कर्णधार..!

IPL 2025: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्स (LSG) ची 2024 मध्ये कामगिरी अत्यंत खराब होती. लखनौने 17 व्या मोसमात 14 सामने खेळले. ज्यामध्ये त्यांना 7 विजय आणि 7 पराभवाला सामोरे जावे लागले. LSG गुणतालिकेत 7 व्या स्थानावर आहे आणि एकही बाद फेरीचा सामना न खेळता स्पर्धेतून बाहेर पडला. अशा परिस्थितीत फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका पुढील हंगामात (IPL 2025) केएल राहुलला सोडून या चार खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकतात.

IPL 2025: या 3 खेळाडू पैकी एकजण होऊ शकतो लखनौचा नवा कर्णधार.

1. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

जर लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) ने 18 व्या हंगामात केएल राहुलला रिलीज केलेच ( ज्याची शक्यता खूप आहे)  तर ते अशा खेळाडूच्या शोधात असतील जो उत्कृष्ट फलंदाजीसह कर्णधाराची भूमिका बजावू शकेल. गेल्या वर्षी लखनौचा सामना मुंबईशी झाला तेव्हा संजीव गोयंका सूर्यकुमार यादववर बराच वेळ चर्चा करताना दिसले.

ज्यानंतर LSG सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून नियुक्त करू शकते अशी अटकळ सुरू झाली.  जर मुंबईने सूर्याला 18 व्या सीझनमध्ये रिलीज केले तर ,लखनऊ त्याला खरेदी करण्याची एकही संधी सोडू इच्छित नाही. सूर्याने आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी कर्णधाराची भूमिका बजावली आहे. अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका जिंकली. त्यामुळे कर्णधार पदाच्या यादीमध्ये लखनौने सूर्याला टार्गेट करने साहजिक आहे.

2. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)

मयंक अग्रवाल आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. या वर्षी SRH त्याला  रिलीज करू शकते. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, फ्रँचायझी मयंकला चार खेळाडू कायम ठेवण्याच्या यादीत समाविष्ट करू शकणार नाही. मयंक अग्रवाल आयपीएल 2025 लिलावात दाखल झाला तर, लखनौ सुपर जायंट्स (LSG) त्याच्यावर मोठी बोली लावू शकते.कारण, शानदार फलंदाजीसोबतच अग्रवालकडे कर्णधारपदाचीही ताकद आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी त्याने ही भूमिका बजावली आहे. सध्या, महाराज ट्रॉफी टी-२० लीगमध्ये बेंगळुरू ब्लास्टर्सचे नेतृत्व करत आहे.

IPL 2025: lSG च्या कर्णधारपदावरून केएल राहुलची हकालपट्टी तय, 'या' 3 खेळाडूंपैकी एकजण होणार नवा कर्णधार..!

3. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

या यादीत तिसरे नाव वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे आहे जो त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो. IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळलो. यावेळी फ्रँचायझी आयपीएल 2025 च्या लिलावात जाऊ शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rinku 🧿🇮🇳 (@rinkukumar12)

भुवनेश्वर कुमार सनरायझर्स हैदराबादच्या एका सामन्यात कर्णधार होताना दिसला आहे. आयपीएलमध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. भुवीने आयपीएलमध्ये एकूण 176 सामने खेळले असून त्यात त्याने 181 विकेट घेतल्या आहेत. एलएसजीने त्याला कर्णधार बनवले तर तो हे आव्हान स्वीकारू शकतो.


हे ही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here