IPL 2025: आयपीएल 2025 आधी एक मेगा लिलाव आयोजित केला जाईल, त्यादरम्यान मेगा लिलावापूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली जाण्याची अपेक्षा आहे. यादरम्यान चाहत्यांमध्ये मुंबई इंडियन्सबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. चाहत्यांना विश्वास आहे की, 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी संघ अनेक मोठ्या खेळाडूंसह यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला सोडू शकतो. अशी शक्यता चाहते व्यक्त करत आहेत. चला तर न्जाणून घेऊया या लिलावाच्या आधी मुंबई इंडियन कोणत्या खेळाडूंना आपल्या संघातून रिलीज करू शकतात..
IPL 2025 आधी मुंबई इंडियन्स या खेळाडूंना सोडू शकते (IPL 2025 MI Released Players)!
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) पुढील आवृत्तीसाठी एक मेगा लिलाव होणार आहे. ज्याची तयारी आतापासूनच सुरू झाली असून, सर्व संघांनीही आपली रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. IPL 2025 मध्ये होणाऱ्या मेगा लिलावात कायम ठेवलेल्या खेळाडूंची संख्या वाढू शकते. यावेळी चाहत्यांमध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या टीमची जोरदार चर्चा आहे.
अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की , मुंबई इंडियन्स मजबूत यष्टीरक्षक इशान किशनसह स्टार खेळाडू टीम डेव्हिड, तिलक वर्मा, पियुष चावला आणि युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस यांनाही सोडू शकते. याशिवाय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माही संघ सोडू शकतो, असे वृत्त होते.
एकीकडे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये चर्चा आहे की, मुंबई इंडियन्स संघाकडून संघातील अनेक स्टार खेळाडूंना सोडले जाऊ शकते. दुसरीकडे, असे देखील बोलले जात आहे की मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी संघ सोडून दुसऱ्या संघात सामील होऊ शकतो.
हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याच्या मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर रोहित शर्मा खूश नसल्याचे वृत्त होते, त्यामुळे तो मुंबई संघ सोडून दुसऱ्या संघात सामील होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी तो लखनऊ सुपर जायंट्स संघात सामील होऊ शकतो, असे बोलले जात होते.
हेही वाचा: