IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 (ipl 2025) ची तयारी लवकरच सुरू होईल. यावेळी आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंचे संघ बदलणार आहेत. IPL 2025 पूर्वी मेगा लिलाव आयोजित केला जाईल. त्याआधी सर्व संघ कायम ठेवलेल्या खेळाडूंची आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील. सनरायझर्स हैदराबादबद्दल बोलायचे झाले तर, या तीन खेळाडूंना ते रिलीज करू शकतात. या तिन्ही खेळाडूंचा मागील हंगामातील प्रवास आणि कामगिरी जरासीही खास नव्हती ज्यामुळे या तिघांना संघ बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते 3 खेळाडू.
IPL 2025 आधी या 3 खेळाडूंची सनरायजर्स हैद्राबाद करू शकते हकालपट्टी..
१.मयंक अगरवाल (Mayank Agarwal)
हैदराबादने (SRH) 2023 मध्ये मयंकला 8.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. यापूर्वी तो पंजाब किंग्जसोबत होता. मयंकने गेल्या मोसमात फक्त 4 सामने खेळले आणि या काळात त्याने 64 धावा केल्या. यापूर्वी 2023 मध्ये त्याने 10 सामन्यात 270 धावा केल्या होत्या. हैदराबाद यावेळी मयंकला रिलीज करू शकते. मेगा लिलावात मयंकच्या जागी संघ दुसऱ्या खेळाडूवर सट्टा लावू शकतो.
2.एडन मार्कराम (Aiden Markram)
3. राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi)
त्रिपाठीने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याची चांगली कामगिरी आयपीएलमध्येही पाहायला मिळाली आहे. मात्र गेल्या मोसमात तो विशेष काही करू शकला नाही. राहुल त्रिपाठीने IPL 2024 च्या 6 सामन्यात 165 धावा केल्या होत्या. या काळात अर्धशतक झाले. त्रिपाठीने आतापर्यंत आयपीएलमध्ये ९५ सामने खेळले आहेत. या कालावधीत 2236 धावा केल्या आहेत. त्रिपाठीने या लीगमध्ये 12 अर्धशतके झळकावली आहेत. राहुलला 2022 मध्ये हैदराबादने 8.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्ससोबत होता.
हे ही वाचा:
- IND vs IRE Live Streaming: विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना आज, पहा कधी? कुठे किती वाजता सुरु होणार पहिला सामना…!
- BIG UPSET: विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तान संघाचा केला पराभव, लज्जास्पद कामगिरीमुळे भडकला बाबर आझम, केले मोठे वक्तवय..