IPL 2025: टीम इंडियाचा महान वेगवान गोलंदाज झहीर खान पुन्हा एकदा IPL मध्ये पुनरागमन करू शकतो. आगामी काळात लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ शकते. लखनौ सुपर जायंट्स आणि त्यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. आयपीएललेटेस्टन्यूजच्या वृत्तानुसार, जर ही चर्चा यशस्वी झाली तर गौतम गंभीरच्या जागी तो संघाचा मार्गदर्शक बनू शकतो. याशिवाय त्याला संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही पाहिले जाऊ शकते. मॉर्नी मॉर्केल आता टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनला आहे. अशा स्थितीत कोचिंग स्टाफमध्ये एक पद रिक्त झाले आहे.
झहीर खानकडे कोचिंगचा चांगला अनुभव!
याआधी झहीर खान टीम इंडियाचा गोलंदाजी कोच बनू शकतो अशी अटकळ होती. मात्र, नंतर त्याच्या जागी मॉर्केलला टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले. झहीर खानला आयपीएलमध्ये कोचिंगचा खूप अनुभव आहे. ते दिल्लीचे प्रशिक्षक आणि कर्णधार राहिले आहेत. याशिवाय त्याने मुंबई इंडियन्ससोबतही खूप काम केले आहे.
झहीर खानची क्रीकेट कारकीर्द.
झहीर खानने भारतासाठी 92 कसोटी, 200 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 100 आयपीएल सामनेही खेळले आहेत. आयपीएलमध्ये, तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), रॉयल चॅलेंजर्स बंगलोरआणि मुंबई इंडियन्स संघांचा भाग आहे. 2017 मध्ये त्याने शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.
आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपरजायंट्स संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. मात्र, याआधी 2022 आणि 2023 मध्ये संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता. संघ अजूनही पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे.
हेही वाचा:
- IND Vs SL 2th ODI Live:जेफ्री वँडरसेसने रचला इतिहास,एक दोन नाही तर भारताचे तब्बल एवढे खेळाडू केले बाद..
- ind vs sl Rohit sharma injured: तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी, आज खेळू शकणार की नाही?