IPL Auction 2024: या दिवशी होणार आयपीएलचा लिलाव, तब्बल 1100 खेळाडूंच्या भवितव्याचा निणर्य; कोण ठरणार सर्वांत महागडा खेळाडू? जाणून घ्या मिनी लीलावाबद्दल सर्व माहिती एका क्लिकवर.

IPL Auction 2024: या दिवशी होणार आयपीएलचा लिलाव, तब्बल 1100 खेळाडूंच्या भवितव्याचा निणर्य; कोण ठरणार सर्वांत महागडा खेळाडू? जाणून घ्या मिनी लीलावाबद्दल सर्व माहिती एका क्लिकवर.

IPL Auction 2024:  IPL 2024 चा लिलाव प्रथमच देशाबाहेर आयोजित केला जाणार आहे. 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका कोला एरिना येथे लिलाव होणार आहे. यावेळी लिलावासाठी 1166 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. मिनी लिलावात 10 फ्रेंचायझी संघ खेळाडूंवर बोली लावताना दिसतील.

यावेळी लिलाव एका दिवसासाठी आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी दोन दिवसांचे आयोजन करण्यात आले होते. लिलावात जास्तीत जास्त 77 खेळाडूच विकत घेतले जातील. गुजरात टायटन्स फ्रँचायझी सर्वोच्च पर्ससह लिलावात प्रवेश करेल. जीटीच्या पर्समध्ये 38.15 कोटी रुपये आहेत तर लखनऊ सुपर जायंट्सच्या पर्समध्ये सर्वात कमी 13.15 कोटी रुपये आहेत.

IPL Auction 2024: या दिवशी होणार आयपीएलचा लिलाव, तब्बल 1100 खेळाडूंच्या भवितव्याचा निणर्य; कोण ठरणार सर्वांत महागडा खेळाडू? जाणून घ्या मिनी लीलावाबद्दल सर्व माहिती एका क्लिकवर.

IPL Auction 2024: किती  भारतीय आणि किती विदेशी खेळाडूंचा लिलावात समावेश?

आयपीएल 2024 च्या लिलावासाठी ज्या खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत त्यापैकी 830 भारतीय आहेत तर 336 परदेशी खेळाडू आहेत. यामध्ये 909 अनकॅप्ड आणि 212 कॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. 45 सहयोगी देशांतील खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. न्यूझीलंडचा उदयोन्मुख अष्टपैलू रचिन रवींद्र आणि विश्वचषकाचा अंतिम सामन्याचा नायक ट्रॅव्हिस हेड यांच्यावर या लिलावात पैशांचा वर्षाव होऊ शकतो. तर दुसरीकडे सर्व  फ्रँचायझींमध्ये मिचेल स्टार्कला खरेदी करण्याची स्पर्धा असेल.

आयपीएल लीलावाबद्दल काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया थोडक्यात.

IPL 2024 Mini Auction: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच होतंय असं काही, तब्बल एवढ्या खेळाडूंनी ठेवलीय 2 कोटी बेस प्राईज..

  1. IPL 2024 चा लिलाव कधी होणार?

आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबरला होणार आहे.

२.IPL 2024 लिलाव कुठे होणार?

IPL 2024 चा लिलाव दुबईतील कोका कोला एरिना येथे होणार आहे.

३.IPL 2024 लिलावासाठी किती खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत?

IPL 2024 च्या लिलावासाठी 1166 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत.

४.IPL 2024 च्या लिलावात किती फ्रँचायझी संघ खेळाडूंवर बोली लावतील?

IPL 2024 च्या लिलावात 10 फ्रँचायझी संघ खेळाडूंवर बोली लावतील.

५.आयपीएल लिलावात किती खेळाडूंवर बोली लावणार?

IPL लिलावात जास्तीत जास्त 77 खेळाडूंवर बोली लावली जाईल.

६.कोणत्या चॅनलवर आयपीएल 2024 लिलाव टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल?

IPL 2024 लिलाव स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल. आयपीएल 2024 लिलावाचे लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *