IPL Auction Live: खेळाडूंवर कोट्यावधी रुपये उधळणारी ‘काव्या मारन’ नक्की आहे तरी कोण? एकेक खेळाडूवर उडवतेय 15/20 कोटी..

IPL Auction Live: खेळाडूंवर कोट्यावधी रुपये उधळणारी 'काव्या मारन' नक्की आहे तरी कोण? एकेक खेळाडूवर उडवतेय 15/20 कोटी..

IPL Auction Live:  आयपीएल 2024 साठी मिनी लिलाव आज दुबईमध्ये पार पडला जात आहे. हळू हळू एकामागे एक अश्या स्टार खेळाडूंवर येथे बोली लावली जात आहे.सर्वच 10 संघाचे निवडलेले लोक इथे बोली लावण्यासाठी आले आहे. ज्यात हैद्राबादच्या संघात एक मुलगी आहे. जी सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनलीय.  या मुलीचे नाव आहे ‘काव्या मारन’

आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यांदरम्यान तुम्ही काव्या मारनला पाहिलं असेल. याशिवाय आयपीएलच्या लिलावाच्या टेबलावर काव्याला खेळाडूंसाठी बोली लावतानाही तुम्ही पाहिले असेल. वास्तविक, काव्या मारन कॅमेरामनवर रागावल्याने चर्चेत आली होती.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काव्या मारन कोण आहे, जी नेहमी SRH टीमला प्रोत्साहन देताना दिसते. चला तर सुरवात करूया.

पॅट कमिन्स

कोण आहे काव्या मारन?

काव्या मारनचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये झाला. 30 वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादची मालकीण कलानिती मारन यांची मुलगी आहे.   ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमचे मालक आणि सीईओ आहेत. याशिवाय काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते.

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावात ती ज्या पद्धतीने बोली लावताना दिसते, त्यावरून संघासाठी खेळाडूंच्या निवडीतही तिची महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट होते.

IPL Auction Live: खेळाडूंवर कोट्यावधी रुपये उधळणारी 'काव्या मारन' नक्की आहे तरी कोण? एकेक खेळाडूवर उडवतेय 15/20 कोटी..

2012 मध्ये, डेक्कन क्रॉनिकलच्या दिवाळखोरीनंतर, सन टीव्हीने डेक्कन चार्जर्स आयपीएल फ्रँचायझी विकत घेतली. यानंतर काव्या मारन क्रिकेट जगतात लोकप्रिय झाली. काव्या मारनचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये झाला होता. २०१९ मध्ये सन टीव्ही नेटवर्कच्या डायरेक्टर्स पॅनलमध्ये काव्याचा समावेश करण्यात आला होता.


ही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *