IPL Brand Value: बाबो..! आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू तब्बल एवढी कोटी रुपये; जाहिराती, संघ, मेगा मिडियामधून दरवर्षी कमावतेय एवढे कोटी..

IPL Brand Value: बाबो..! आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू तब्बल एवढी कोटी रुपये; जाहिराती, संघ, मेगा मिडियामधून दरवर्षी कमावतेय एवढे कोटी..

IPL Brand Value: IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. ज्यासाठी 333 खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे, परंतु त्यापैकी केवळ 77 खेळाडू बोली लावणार आहेत. पुन्हा एकदा फ्रँचायझी लिलावात खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लावणार आहेत. आयपीएल ही जगातील सर्वात महागडी T20 लीग मानली जाते. पण सध्या आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

IPL Brand Value: आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू किती ?

ब्रँड व्हॅल्यूएशन कन्सल्टन्सी ब्रँड फायनान्सने एका अहवालात म्हटले आहे की, इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या एकूण ब्रँड मूल्यात IPL 2023 पासून 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 10.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच 89,232 कोटी रुपये आहे. आयपीएलचा पहिला सीझन 2008 मध्ये खेळला गेला होता.

IPL 2024 Tital Sponsor

तेव्हापासून आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू सातत्याने वाढत आहे. आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये सातत्याने होणारी वाढ स्टेडियममधील प्रेक्षकांची प्रचंड संख्या, इंटरनेटवरील आयपीएल सामन्यांचा जास्त वापर आणि इतर माध्यमे आणि मेगा-मीडिया भागीदारी यांना कारणीभूत ठरू शकते.

मुंबई इंडियन्स ही आयपीएलची सर्वात महागडी फ्रँचायझी आहे.

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ही आयपीएलची सर्वात महागडी फ्रँचायझी आहे. मुंबईची ब्रँड व्हॅल्यू सध्या 725 कोटी रुपये आहे. पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स लिलावात खेळाडूंवर बोली लावण्यासाठी सज्ज झाली आहे.

IPL Brand Value: बाबो..! आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू तब्बल एवढी कोटी रुपये; जाहिराती, संघ, मेगा मिडियामधून दरवर्षी कमावतेय एवढे कोटी..

लिलावापूर्वी हार्दिक पांड्याच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सला आणखी बळ मिळाले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, गेल्या दोन मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी काही विशेष झाली नाही. अशा स्थितीत यंदा संघ नव्या उमेदीने आयपीएलमध्ये उतरणार आहे.

आयपीएल संघांचे ब्रँड मूल्य

  1. मुंबई इंडियन्स – 725 कोटी
  2. CSK – 675 कोटी
  3. KKR- 657 कोटी.
  4. RCB – 582 कोटी

    हेही वाचा:

    IPL 2024 Auction: स्मिथ किंवा पॅट कमिन्स नाही तर लिलावात ‘या’ खेळाडूवर लागू शकते आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी बोली, आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरणे निच्छित..

    शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *