आयपीएलच्या इतिहासातील एकमेव खेळाडू ज्याने एकाच वर्षात जिंकली होती ऑरेंज कॅप आणि ट्रॉफी, जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू
२०२० मध्ये कोरोनाच्या महामारी रोगामुळे काही काळ आयपीएल पुढे ढकलण्यात आली होती. जो की हा व्हायरस नसता तर क्रिकेट प्रेमी आयपीएल चा आनंद लुटत असते. जरी आयपीएल काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली तरीही चाहते २०२० च्या अगदी अंतिम टप्प्यात आयोजित करतील या अपक्षेवर अवलंबून होते. मात्र २०२० मध्ये जो अंतिम निर्णय येणार होते त्याची कळकळीने चाहते वाट पाहत होते. २०२० मध्ये जे आयपीएल झाले त्याच्या काही मनोरंजक गोष्टी तसेच काही रेकॉर्ड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

या रेकॉर्डबद्धल कदाचित तुम्हाला माहिती असेल :-
२००८ साली आयपीएल ची सुरुवात झाली जे की आयपीएल मध्ये दरवर्षीप्रमाणे जो खेळाडू सर्वात जास्त धावा करेल त्या खेळाडूस ऑरेंज कॅप देऊन सन्मानित केले जाते. ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंनी ही कॅप प्राप्त केली आहे. हे दिग्गज खेळाडू सोडूनही दुसऱ्या अनेक खेळाडूंनी ही कॅप प्राप्त केली आहे , मात्र त्या वर्षी त्या त्या संघाला आयपीएल ची ट्रॉफी काही जिंकता आली नाही. मात्र आतापर्यंत इतिहासात एकमेव खेळाडू झाला ज्याने एकाच वर्षात ऑरेंज कॅप सुद्धा जिंकली आणि आयपीएल ची ट्रॉफी सुद्धा आपल्या संघाला मिळवून दिली.
उथप्पाने इतिहास रचला :-
रॉबिन उत्तप्पा हा खेळाडू उजव्या हाताने बॅटिंग करत असून त्याने एकाच वर्षी ऑरेंज कॅप सुद्धा आपल्या नावे केली तसेच आपल्या संघाला आयपीएल ची ट्रॉफी सुद्धा जिकवून देण्यात मदत केली. कोलकाता नाईट रायडर्स या संघात खेळत असून २०१४ मध्ये हा आयपीएल च्या इतिहासात विक्रम केला. २०१४ मध्ये रॉबिन ने १६ मॅच खेळत अगदी ४४ धावांचा डाव खेळत १३७.७९ चा स्ट्राईक रेट ठेवत ६६० धावा केल्या असून अगदी अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स ने किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध तीन विकेट्स राखून आयपीएल ची ट्रॉफी जिंकली.
आता राजस्थानचा भाग :-
आयपीएल मध्ये रॉबिन उथपा मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पुणे वॉरियर्स इंडिया तसेच कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा एक महत्वपूर्ण भाग राहिलेला आहे. २०२० मध्ये रॉबिन ला राजस्थान रॉयल या संघाने तीन कोटी रुपयांना खरेदी केले होते. आयपीएल मध्ये उथपा ने १७७ सामने खेळले आणि १३०.५ चा स्ट्राईक रेट ठेवून रॉबिन ने ४४११ धावा केल्या होत्या. रॉबिन ने जवळपास १५६ सिक्स मारले आहेत.