ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

0
5
ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

 IPL Orange & Purple Cap Price Money: आयपीएलच्या प्रत्येक हंगामात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ऑरेंज कॅप पर्पल कॅप सारखे पुरस्कार दिले जातात. लीग मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिला जातो तर गोलंदाजीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देऊन सन्मान केले जाते. यासोबतच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर इमर्जिंग प्लेयर आणि फेयर प्ले अवॉर्ड सारखे पुरस्कार देखील इंडियन प्रीमियर लीग मध्ये दिले जातात.

ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती मिळतात पैसे? ( IPL award Orange Cap price Money)

आयपीएल मधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जाणारा ऑरेंज कॅपचा पुरस्कार हा सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला दिला जातो. आतापर्यंत डेव्हिड वॉर्न,र क्रिस गेल,विराट कोहली यासारखे दिग्गज क्रिकेटपटू या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ऑरेंज कॅप विनर खेळाडूला 15 लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का?  जाणून घ्या सविस्तर..
ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

2008 मध्ये बीसीसीआयने आयपीएल ही क्रिकेट लीग स्पर्धा सुरू केली. या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून ऑरेंज कॅप दिली जाते. ऑरेंज कॅप मिळवण्यामध्ये भारतीय तसेच विदेशी खेळाडूंमध्ये चांगली स्पर्धा नेहमीच रंगलेली पाहायला मिळते. आतापर्यंत सहा भारतीय खेळाडूंनी तर सहा विदेशी खेळाडूंनी ही कॅप पटकावली आहे.

‘युनिव्हर्सल बॉस’ या नावाने प्रसिद्ध असलेला वेस्टइंडीज चा धडाकेबाज माजी फलंदाज ख्रिस गेल हा आयपीएल मध्ये दोनदा ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. 2011 आणि 2012 मध्ये अनुक्रमे 608 व 733 धावा केल्या.

2008 पासून आयपीएलमध्ये खेळताना त्याने एक स्वतःचा वेगळा धाक निर्माण करत अनेक विक्रम रचले आहेत. लीगमध्ये त्याने बंगळूर आणि केकेआर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शॉन मार्श याने 2008 मध्ये पहिल्यांदा 616 धावा करत ऑरेंज कॅप मिळवली होती. या धमाकेदार कामगिरीनंतरच त्याला ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघामध्ये निवडण्यात आले होते. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडणाऱ्या या खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती मिळतात पैसे? (IPL award Purple Cap price Money)

यासह गोलंदाजीत लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप देऊन गौरवले जाते. आतापर्यंत 17 खेळाडूंनी या पुरस्कारावर आपली मोहोर लावली आहे. यात भुवनेश्वर कुमार कंगीसो रबाडा यासारख्या दिग्गज गोलंदाजांचा समावेश आहे. ऑरेंज कॅप प्रमाणे पर्पल कॅपच्या पुरस्काराचे रक्कम देखील समान आहे पर्पल कॅप विजेता खेळाडूला 15 लाख रुपये दिले जातात.

इंडियन प्रीमियर लीग (IPL)  मध्ये पर्पल कॅप (Purple Cap Price Money)  हा मानाचा पुरस्कार मानला जातो. आयपीएल मध्ये एका सीझनमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप देऊन सन्मान केला जातो. आतापर्यंत 16 खेळाडूंना ही मानाची कॅप देण्यात आली. विशेष म्हणजे भुवनेश्वर कुमार या भारतीय खेळाडूने आतापर्यंत दोनदा म्हणजे 2016 आणि 2017 मध्ये या कॅपचा मानकरी ठरला. आयपीएल 2013, 2014 आणि 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजाचा दबदबा राहिला. सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सीएसकेचे गोलंदाज पहिल्या स्थानावर होते.

किंग कोहली
किंग कोहली

राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी प्रत्येकी दोनदा आयपीएल मध्ये सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप जिंकली आहे. ही कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तीन फिरकीपटूपटूंचा समावेश आहे.

भारताचा माजी फिरकीपट्टू प्रज्ञान ओझा हा आयपीएल मध्ये पर्पल कॅप जिंकणारा पहिला फिरकीपटू ठरला. त्याने 2010 मध्ये डेक्कन चार्जेस कडून खेळताना 21 बळी घेतले होते. आयपीएल मधील 92 सामन्यात 27.36 च्या सरासरीने 82 विकेट घेण्यात या खेळाडूला यश आले. आयपीएल मध्ये या खेळाडूला डेक्कन चार्जेस आणि त्यानंतर मुंबई इंडियन्स या संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

आयपीएल मध्ये पर्पल कॅप जिंकणारा इम्रान ताहीर हा पहिला विदेशी फिरकीपटू ठरला. त्याने 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना तब्बल 26 विकेट घेतले होते. मात्र अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स ने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी खेळाडूने आयपीएलमध्ये खेळलेल्या आतापर्यंतच्या 38 टी 20 सामन्यांमध्ये त्याला 63 गडी बाद करता आले. इम्रान ताहीर सध्या समालोचकाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 31 सामने सुरू झाले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये विराट कोहली सर्वात पुढे आहे तर युजवेंद्र चहल हा पर्पल कॅपच्या रेस मध्ये गोलंदाजीत पुढे आहे. मैदानावर या दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

आयपीएल मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या चॅम्पियन संघाला 20 कोटी रुपयांची मोठी रक्कम दिली जाते तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये देऊन गौरवले जाते. आयपीएलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहणाऱ्या संघांना अनुक्रमे सात कोटी आणि 6.5 कोटी रुपयांची रोख रक्कम दिली जाते.

ऑरेंज कॅप व पर्पल कॅप शिवाय आयपीएलमध्ये काही पुरस्कार दिले जातात, त्यामध्ये इमर्जिंग प्लेयर ऑफ टूर्नामेंट, मोस्ट वेल्यूएबल प्लेयर, पावर प्लेयर ऑफ सीजन, गेम चेंजर ऑफ सीजन आणि सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन यासारखे पुरस्कार देऊन गौरविले जाते.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here