IPL 2024 चा दुसरा टप्पा भारतात होणार नसून होणार या देशात, हा देश करणार यंदा आयपीएल होस्ट.

Cricket 17

 

 

गेल्या 17 वर्षापासून आपल्या देशात आयपीएल T20 ला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाला पसंती देत आहेत. अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. गेल्या काही दिवसांपासून WPL चे सामने सुरू आहेत येणाऱ्या महिन्यात आयपीएल ला सुरुवात होईल बऱ्यापैकी आयपीएल चे सामने हे आपल्याच देशात होतात परंतु आयपीएल ला दुसरा टप्पा हा भारताच्या बाहेर होणार आहे तर जाणून घेऊया आयपीएल चा दुसरा टप्पा कोणत्या देशात होणार आहे.

Cricket 17

 

आयपीएल च्या नवीन सीजन ची सुरुवात 22मार्च पासून होणार आहे. परंतु आतापर्यंत आयपीएल चे पूर्ण टाईम टेबल बनले नाही. अवघ्या 21 सामन्यांचे व्यवस्थापन झाले आहे. त्यामुळे उर्वरित सामने भारताच्या बाहेर म्हणजे UAE मध्ये खेळले जातील अशी चर्चा सुरू आहे. बाकीचे उर्वरित सामने देशाबाहेर घेण्याचे कारण म्हणजे यंदा देशात लोकसभा निवडणुकी ला देशभरात सुरुवात झाली आहे. त्यामुळे BCCI ने केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

 

निवडणूक आयोग येत्या शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहेत. त्यानंतर आयपीएल च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. मात्र, निवडणुकांमुळे बीसीसीआयला आयपीएल आयोजित करण्यात अडचणी येऊ शकतात. या कारणास्तव भारतीय बोर्ड आयपीएल बाहेरच्या देशात खेळण्याचा विचारात आहे.

 

यूएईमध्ये बीसीसीआयचे अधिकारी:-

येत्या 22 मार्च पासून आयपीएल ला सुरुवात होईल परंतु आतापर्यंत अवघ्या 21 सामन्यांचे आयोजन केले आहे. उर्वरित सामन्यांचे आयोजन हे लोकसभा निवडणुकीच्या तारीखी जाहीर झाल्यानंतर करण्यात येणार आहे. तसेच अशी सुद्धा शक्यता आहे की आयपीएल च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन हे UAE मद्ये होऊ शकते. त्यासाठी BCCI चे अधिकारी UAE मद्ये गेले आहेत. सुरुवात आणि सामन्यांचा शेवट हा आपल्याच देशात होणार आहे शिवाय आयपीएल चा मधील टप्पा हा UAE मद्ये होईल अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.

 

 

 

दुसऱ्यांदा आयपीएल मॅचेस भारताबाहेर:-

जेव्हा आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुका लागतात त्या वर्षी आयपीएल सामन्यांवर समस्या येतात. जेव्हा 2009 साली लोकसभेची निवडणूक होती त्या वेळी सुद्धा आयपीएल चे सामने देशाबाहेरसाऊथ आफ्रिका येथे घेतले गेले होते. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीमुळे आयपीएल चे सामने UAE मध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर कोरोना च्या काळात आयपीएल चे सामने हे UAE मध्ये ठेवण्यात आले होते.

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

हे ही वाचा:-IPL T20 : मैदानात धुवाधार षटकारांचा पाऊस पडणारे फलंदाज आहेत तरी कोण, भारतातील या फलंदाजाचा समावेश.

 

 

हे ही वाचा:- आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक जास्त वेळा पराभूत झालेले संघ,RCB आणि मुंबई इंडियन्स या स्थानी.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *