IPL Record: आयपीएल मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय खेळाडूचा बोलबाला, पहा सर्वोत्कृष्ट 6 गोलंदाज..!

IPL Record: आयपीएल मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय खेळाडूचा बोलबाला, पहा सर्वोत्कृष्ट 6 गोलंदाज..!

 IPL Record: टी20 क्रिकेट मधील सर्वच नियम हे फलंदाजासाठी अनुकूल आहेत. प्रत्येक गोलंदाजांना चार षटकाची गोलंदाजी करायला मिळते. तसेच मैदानाची लांबी देखील कमी केली जाते. त्यामुळे आपसूकपणे फलंदाजांना धावा करण्यास सोपे जाते. त्यातूनही गोलंदाज आपल्या धारदार गोलंदाजीने बाजी मारतात. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केलेल्या खेळाडूंची माहिती पुढील प्रमाणे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारे 6 गोलंदाज.

1.अल्जारी जोसेफ

IPL Record: आयपीएल मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय खेळाडूचा बोलबाला, पहा सर्वोत्कृष्ट 6 गोलंदाज..!

वेस्टइंडीजचा युवा वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफ याने IPL 2019 मध्ये पदार्पण केले होते. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना आपल्या धारदार गोलंदाजीने सनरायझर्स हैदराबाद संघाचे धाबे दानाणून सोडले. त्याने अवघ्या बारा धावात सहा गडी बाद केले. त्याच्या या धारदार गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादचा संघ 136 धावा करू शकला नाही. हा सामना मुंबई इंडियन्सने सहजपणे जिंकला. 

2.सोहेल तनवीर

2008 मध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तनवीर याने 14 धावा देत सहा महत्त्वपूर्ण गडी बाद केले होते. सोहेल तनवीर आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. त्याने ही धडाकेबाज कामगिरी चेन्नई सुपर किंग्स संघ विरुद्ध केली होती. त्याच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईचा मजबूत संघ 109 धावांवर आटोपला.

3.ॲडम जॅम्पा

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ॲडम जॅम्पा याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळताना चार षटकात 19 धावा देत सहा गडी बाद केले होते.

IPL Record: आयपीएल मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारतीय खेळाडूचा बोलबाला, पहा सर्वोत्कृष्ट 6 गोलंदाज..!

4.अनिल कुंबळे

भारताचा स्टार माजी फिरकीपट्टू अनिल कुंबळे यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना 3.5 षटकात पाच धावा देत पाच गडी बंगळूरला एक मोठा विजय मिळवून दिला. अनिल कुंबळेच्या फिरकीपुढं राजस्थान रॉयल्स चा संघ ढेपाळून गेला. त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे राजस्थानचा संघ 133 धावा करू शकला नाही.

5.आकाश मधवाल

‘अनकॅप्ड’ खेळाडू आकाश मधवाल याने धारदार गोलंदाजी करत मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून दिला. एलीमीनेटर राऊंडमध्ये लखनऊ सुपर जेन्ट्स संघाविरुद्ध खेळताना 3.5 षटकांमध्ये पाच गडी बाद केले. त्याच्या धमाकेदार कामगिरीमुळे तो अचानक प्रकाश झोतात आला. आकाश सारखे खेळाडू मुंबई इंडियन्सच्या संघात असल्यामुळे त्यांची गोलंदाजी स्ट्रॉंग झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

6.जसप्रीत बुमराह

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने केकेआरच्या संघाविरुद्ध खेळताना चार षटकात दहा धावा देत पाच गडी बाद केले होते. मुंबई इंडियन्सला आता अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. मागील वर्षी दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आयपीएलला मुकला होता. त्याचा प्रभाव मुंबई इंडियन्सच्या कामगिरी वरती झाला होता.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *