IPL RECORDS: ख्रिस गेलची अशी इनिंग ज्यात गोलंदाजांना अक्षरशा रडू कोसळले होते, मारले होते तब्बल एवढे षटकार की आजही विक्रम तुटेना..!

IPL RECORDS: ख्रिस गेलची अशी इनिंग ज्यात गोलंदाजांना अक्षरशा रडू कोसळले होते, मारले होते तब्बल एवढे षटकार की आजही विक्रम तुटेना..!

IPL RECORDS : आतापासून काही दिवसांतच आयपीएल 2024 (IPL 2024) सुरू होणार आहे. यावेळी  पहिला सामना 22 मार्च रोजी होणार आहे. त्याआधी आयपीएलमधील काही रोमांचक विक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम आम्ही हाती घेतलय. या फिचरमध्ये आज आम्ही तुम्हाला 10 वर्षांपूर्वी खेळल्या गेलेल्या एका इनिंगबद्दल माहिती देणार आहोत, मागचे 10 वर्ष झाली त्या इनिंग सारखी ताबडतोब इनिंग आयपीएलच्या इतिहासात आजून एकही फलंदाज खेळू शकला नाहीये.

आम्ही बोलत आहोत वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या आयपीएलमधील एका इनिंगबद्दल ज्यात त्याने विक्रमांची अक्षरशा मोडतोड केली होती. आरसीबीकडून खेळताना ख्रिस गेलने एका डावात इतके षटकार ठोकले होते  की, सर्व विक्रम नष्ट झाले. आतापर्यंत बाकीच्या फलंदाजांसाठी आयपीएल सामन्याच्या एका डावात इतके षटकार मारणे स्वप्नासारखे होते. ख्रिस गेलने 2013 मध्ये आरसीबीसाठी एका डावात 17 षटकार मारले होते.

चला तर जाणून घेऊया त्या दिवसाच्या खेळीबद्दल आणखी सविस्तर..

IPL RECORDS: ख्रिस गेलची अशी इनिंग ज्यात गोलंदाजांना अक्षरशा रडू कोसळले होते, मारले होते तब्बल एवढे षटकार की आजही विक्रम तुटेना..!

2013 चा आयपीएल हंगाम सुरु होता. ख्रिस गेल विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत होता. समोर ॲरोन फिंचच्या नेतृत्वाखाली पुणे वॉरियर्स संघ होता. आरसीबीसाठी ख्रिस गेल आणि तिलकरत्ने दिलशान सलामीवीर म्हणून आले होते जे प्रथम फलंदाजीला आले होते. सामन्याच्या सुरुवातीपासूनच ख्रिस गेल वेगळ्या शैलीत फलंदाजी करत होता. गेल नेहमीच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात असला तरी यावेळी सामन्यात तो अधिक स्फोटक फलंदाजी करत होता. तिलकरत्ने दिलशान ३३ धावा करून बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या विराट कोहलीलाही केवळ 11 धावा करता आल्या. पण गेलचे आक्रमण सुरूच होते.

IPL RECORDS:  एबी डिव्हिलियर्सने 8 चेंडूत 31 धावांची शानदार खेळी केली.

ख्रिस गेलने आधी अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर शतकाकडे वाटचाल केली. काही वेळातच त्याचे शतकही पूर्ण झाले. पण गेलने फलंदाजी सुरूच ठेवली. शेवटच्या काही षटकांमध्ये एबी डिव्हिलियर्सनेही 8 चेंडूत 31 धावांची शानदार खेळी केली. ख्रिस गेल शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने 66 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या. यादरम्यान त्याने 17 षटकार आणि 13 चौकार मारले. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाला आयपीएलच्या एकाच डावात इतके षटकार मारता आलेले नाहीत. आरसीबीने 263 धावांची भयानक धावसंख्या उभारली. याला प्रत्युत्तर देताना पुणे वॉरियर्सचा संपूर्ण संघ केवळ 133 धावाच करू शकला. अशाप्रकारे पुण्याला 130 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. ख्रिस गेलने एकट्याने केलेल्या धावा विरोधी संघातील सर्व खेळाडूंना मिळूनही करता आल्या नाहीत.

IPL RECORDS: ख्रिस गेलची अशी इनिंग ज्यात गोलंदाजांना अक्षरशा रडू कोसळले होते, मारले होते तब्बल एवढे षटकार की आजही विक्रम तुटेना..!

यापूर्वी हा विक्रम ब्रेंडन मुक्कुलमच्या नावावर होता.

या सामन्यापूर्वी 2008 साली आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांच्यात खेळला गेला होता, तेव्हा ब्रेंडन मॅक्युलमने एका डावात 13 षटकार ठोकले होते. 2012 मध्ये ख्रिस गेलने दिल्लीविरुद्ध 13 षटकार ठोकले होते. तो विक्रम एकाही षटकाराने तो मोडू शकला नाही, पण त्याने तो असा मोडला की दहा वर्षांनंतरही कोणताही खेळाडू तो मागे सोडू शकलेला नाही. आता ख्रिस गेलनेही आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. भविष्यात ख्रिस गेलचा हा विक्रम कोणता फलंदाज मोडू शकेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (IPL RECORDS OF CHRIS GAYLE)


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

– IPL 2024: हे तीन दिग्गज खेळाडू आहेत धोनीच्या कर्णधारपदाचे चाहते, जाणून घ्या सविस्तर.– BCCI Central Contract 2024: रिंकू सिंग, रजत पाटीदार यांच्यासह अनेक नवीन आणि युवा खेळाडूंना संधी, परंतु या दिग्गज अनुभवी खेळाडूंची हकालपट्टी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *