IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात डावखुऱ्या गोलंदाजाचा देखील बोलबाला, हे आहेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज!

IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात डावखुऱ्या गोलंदाजाचा देखील बोलबाला, हे आहेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज!

IPL RECORDS:  2008 पासून सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत फलंदाजासोबत गोलंदाजांनी देखील आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. विशेषता यामध्ये फिरकी व उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाजा सोबतच डावखुऱ्या गोलंदाजांनी देखील आपली वेगळी छाप सोडली आहे. डावखुऱ्या गोलंदाजाच्या यादीत यामध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. चला तर या विशेष लेखामध्ये जाणून घेऊया आयपीएल स्पर्धेमध्ये कोणत्या डावखुऱ्या गोलंदाजाने सर्वाधिक बळी घेतले आहेत.

IPL RECORDS:  या डावखुऱ्या गोलंदाजांनी मिळवलेत सर्वाधिक विकेट्स..

 आशिष नेहरा : भारताचा माजी खेळाडू वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी 88 सामन्यात 106 गडी बाद केले आहेत. आता तो क्रिकेटमधून निवृत्त झाला असून सध्या तो गुजरात टायटन संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे त्याच्याच नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्यांदाच आयपीएलचा किताब पटकावला होता.

IPL 10: विकेटों का सैकड़ा लगाने वाले बाएं हाथ के पहले गेंदबाज बने आशीष नेहरा  | IPL 2017 T20: Ashish Nehra joins 100-wicket club and other stats from SRH  vs RCB - Hindi MyKhel

 ट्रेंट बोल्ट : न्यूझीलंडचा जागतिक कीर्तीचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने प्रत्येक वेळेस आपल्या घातक गोलींदाजीने दमदार प्रदर्शन केले आहे. त्याने देखील 88 सामन्यात 105 गडी बाद केले आहेत. आशिष नेहराला पाठीमागे टाकण्यासाठी दोन बळींची आवश्यकता आहे. सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या डावखऱ्या गोलंदाजाच्या यादी तो दुसऱ्या स्थानावर आहे.

 जहीर खान: ‘जॅक’ या नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान यांनी देखील 100 सामन्यात 102 बळी टिपले आहेत. आयपीएल मध्ये त्याने मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केले होते. तसेच काही वेळ त्याने मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदाची धुरा देखील त्याने सांभाळली आहे. सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत दिसतोय.

जयदेव उनडकट : रणजी क्रिकेटमध्ये बळींचा पाऊस पडणाऱ्या जयदेव उनडकट याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडता आली नाही. मात्र त्याने आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. त्याने 91 सामन्यात 84 बळी टिपल्याची नोंद आहे. सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे.

आरपी सिंग: 2007 साली टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारताला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आरपी सिंग ची आयपीएल मधील कामगिरी ठीकठाक आहे. त्याने 90 सामन्यात 82 बळी टिपले आहेत.

IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात डावखुऱ्या गोलंदाजाचा देखील बोलबाला, हे आहेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज!

 इरफान पठाण: 2003 साली पाकिस्तानचा दौरा गाजवणारा भारताचा मध्यम गती वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने देखील 103 सामन्यात 80 बळी घेतले आहेत. फॉर्म आणि फिटनेस मुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्य टिकवता आले नाही. सध्या तो समालोचकाच्या भूमिकेत दिसतोय.

 मिचेल मॅकगेलन: मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा मिचेल मॅकगेलन याने 56 सामन्यात 71 बळी टिपले आहेत. तो मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मीचल जॉन्सन याने 54 सामन्यात 61 बळी टिपले होते. त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

 जेम्स फॉकनर: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान मध्यमगती गोलंदाज जेम्स फॉकनर याने 60 सामन्यात 59 बळी टिपले होते. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांनाच प्रभावित करणाऱ्या या गोलंदाजाला कामगिरीमध्ये सातत्य टिकवता आले नाही.

IPL RECORDS:  आयपीएलच्या इतिहासात डावखुऱ्या गोलंदाजाचा देखील बोलबाला, हे आहेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज!

खलील अहमद : भारताचा डावखुरा युवा वेगवान गोलंदाज खलील अहमद याने 43 सामन्यात 57 बळी टिपल्याची नोंद आहे. खराब फॉर्ममुळे त्याला संघामध्ये स्थान पक्के करता आले नाही. त्यामुळे तो सध्या संघाबाहेर आहे.यंदाच्या वर्षात तो आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळत आहे.

तर मित्रांनो, हे होते ते डावखुरे गोलंदाज ज्यांनी आयपीएल स्पर्धेमाध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. वरीलपैकी कोणता गोलंदाज तुमचा आवडता गोलंदाज आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि अश्याच आयपीएलच्या ताज्या घडामोडी वाचण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका..


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

– आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा हा आहे पहिला विदेशी खेळाडू!

– एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारी हे आहेत खेळाडू! वाचा विराटला कोणते मैदान ठरले लकी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *