IPL RECORDS: आयपीएलच्या एका हंगामात या खेळाडूने जिंकलाय सर्वांत जास्त वेळा ‘सामनावीर’ पुरस्कार, आजपर्यंत दुसरा कुणीही तोडू शकला नाहीये विक्रम…

IPL RECORDS: आयपीएलच्या एका हंगामात या खेळाडूने जिंकलाय सर्वांत जास्त वेळा 'सामनावीर' पुरस्कार, आजपर्यंत दुसरा कुणीही तोडू शकला नाहीये विक्रम...

IPL RECORDS: येत्या 19 डिसेंबरला दुबईमध्ये आयपीएल 2024 चा मिनी लिलाव आयोजित केला गेला आहे.जसेजसे आयपीएल 2024 जवळ येत आहे. तसे तसे क्रिकेट चाह्त्यांमधील उत्साह वाढत चालला आहे.

आवडत्या स्टार्सला लवकरात लवकर मैदानात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दररोज आम्ही तुमच्यासाठी आयपीएलशी संबंधित काही मनोरंजक आकडेवारी किंवा कथा घेऊन येत आहोत. आजही आम्ही तुमच्यासाठी असाच एक विक्रम घेऊन आलो आहोत, ज्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल.

Taapsee Pannu Affair: अभिनेत्री तापसी पन्नूचे आहे या खेळाडूसोबत अफेअर, पहिल्यांदाच खुलेपणाने बोलत म्हणाली, ‘त्याच्यासोबतच्या नात्याचा अभिमान’

IPL RECORDS: या खेळाडूने एका हंगामात 6 वेळा जिंकलाय ‘सामनावीर’ पुरस्कार

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलला या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 21 वेळा हा पुरस्कार मिळाला आहे.

IPL 2024 mini auction players list: तब्बल 333 खेळाडूंची यादी समोर, कोण ठरणार सर्वांत महागडा खेळाडू;कोणत्या संघाकडे किती कोटी बाकी? पहा संपूर्ण माहिती..

पण तुम्हाला माहित आहे का की आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे? वास्तविक, हा अनोखा विक्रमही गेलच्या नावावर आहे.

IPL RECORDS: 2011 च्या आयपीएल हंगामात युनिव्हर्स बॉसने हा इतिहास रचला होता

ख्रिस गेलने आयपीएल 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना ही कामगिरी केली होती. गेलने त्या हंगामात आरसीबीसाठी 12 डावांमध्ये 67.56 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 183.13 च्या स्फोटक स्ट्राइक रेटने 608 धावा केल्या होत्या. या काळात ख्रिस गेलच्या बॅटमधून दोन शतके आणि तीन अर्धशतकेही झळकली. आयपीएल 4 मध्ये सर्वाधिक धावा केल्याबद्दल ख्रिस गेलला ऑरेंज कॅप पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

या 12 डावांमध्ये ख्रिस गेल सहा वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला होता आजपर्यंत दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला एकाच सत्रात इतके ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकता आलेले नाहीत.

IPL RECORDS: आयपीएलच्या एका हंगामात या खेळाडूने जिंकलाय सर्वांत जास्त वेळा 'सामनावीर' पुरस्कार, आजपर्यंत दुसरा कुणीही तोडू शकला नाहीये विक्रम...

IPL RECORDS: या सामन्यांमध्ये ख्रिस गेलने पटकावला होता सामनावीर पुरस्कार.

 1.  KKR 102 (55)
 2. पंजाब 107 (49)
 3. कोची 44 (16)
 4. KKR ३८ (१२)
 5. चेन्नई 75 (50)
 6. मुंबई 89 (47)

  हेही वाचा:

  IPL 2024 Auction: स्मिथ किंवा पॅट कमिन्स नाही तर लिलावात ‘या’ खेळाडूवर लागू शकते आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी बोली, आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरणे निच्छित..

  शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *