IPL Records: या 5 यष्टीरक्षक फलंदाजांनी आयपीएलमध्ये काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकच विदेशी खेळाडू सामील…

IPL Records: या 5 यष्टीरक्षक फलंदाजांनी आयपीएलमध्ये काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकच विदेशी खेळाडू सामील...

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

IPL Records: आयपीएलमध्ये अनेक विक्रम होतात आणि मोडतात ही. मात्र काही स्टार खेळाडूंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये तयार केलेले विक्रम मोडणे नवीन  खेळाडूसाठी सहजा सहज सोपे नसते. आज आम्ही तुम्हाला आयपीएलमधील अश्याच काही विक्रमाबद्दल सांगणार आहोत जे मोडणे शक्य नाहीये.. आयपीएल मध्ये यष्टी रक्षक फलंदाज म्हणून खेळतांना कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक धावा काढल्या आहेत याबदल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग सुरवात करूया आजच्या या लेखाला..

या 5 यष्टीरक्षक फलंदाजांनी आयपीएलमध्ये काढल्यात सर्वाधिक धावा.

दोन सामने झाले तरी महेंद्रसिंग धोनीला फलंदाजी करण्याची संधी का भेटत नाही? प्रशिक्षकाने दिले उत्तर, थाला कधी उतरणार मैदानात?

1.महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. धोनीने आयपीएल मध्ये 5001 धावा केल्या आहेत. त्याच्या इतक्या धावा इतर कोणत्याच फलंदाजाला करता आल्या नाहीत. त्याचे यंदाचे शेवटचे आयपीएलचे वर्ष असल्याचे बोलले जात आहे. यंदाच्या हंगामात त्याला पहिल्या दोन सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याने 32 धावांची आक्रमक खेळी केली होती.

2.दिनेश कार्तिक

आरसीबीचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने 4,227 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक यंदाचे शेवटचे आयपीएल वर्ष खेळतोय. त्याने आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स, केकेआर आणि आरसीबीच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या हंगामामध्ये त्याचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला तर जून मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत साठी त्याची निवड होऊ शकते.

 

IPL Records: या 5 यष्टीरक्षक फलंदाजांनी आयपीएलमध्ये काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकच विदेशी खेळाडू सामील...
IPL Records: या 5 यष्टीरक्षक फलंदाजांनी आयपीएलमध्ये काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकच विदेशी खेळाडू सामील…

3.क्विंटन डी कॉक

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने 3046 धावा केल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणारा तो पहिला विदेशी खेळाडू आहे. आयपीएल मध्ये तो सध्या लखनऊ संघाचे प्रतिनिधित्व करतोय. याआधी तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता.

4.रॉबिन उथप्पा

रॉबिन उथप्पा याने आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्स केकेआर आणि आरसीबीच्या संघाकडून प्रतिनिधित्व केले होते. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना त्याने आयपीएल मध्ये तीन हजार अकरा धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा काढणाऱ्या यष्टिरक्षक फलंदाजाच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघात झाली 'या' आफ्रिकन खेळाडूची एन्ट्री; हॅरी ब्रूकच्या जागी संघात खेळणार...!

5. ऋषभ पंत

भारताचा युवा स्टार खेळाडू ऋषभ पंत याने आयपीएल मध्ये 2737 धावा केल्या आहेत. आयपीएल मध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करतोय. आयपीएल मध्ये सर्व सामने त्यांनी या संघाकडून खेळले आहेत. यंदाच्या हंगामात त्याने आयपीएल मध्ये जबरदस्त कामगिरी केली तर t20 संघामध्ये त्याची देखील निवड होऊ शकते. त्याच्या कामगिरीकडे साऱ्या क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!