IPL RECORDS: आयपीएलमध्ये ‘या’ स्फोटक 3 फलंदाजांनी एकाच षटकात ठोकलेत सर्वाधिक षटकार, ख्रिस गेलचा आकडा पाहून बसेल धक्का..!

IPL RECORDS: आयपीएलमध्ये 'या' स्फोटक 3 फलंदाजांनी एकाच षटकात ठोकलेत सर्वाधिक षटकार, ख्रिस गेलचा आकडा पाहून बसेल धक्का..!

IPL RECORDS : आयपीएल 2024 (ipl 2024) जसे जसे जवळ येत आहे तसे तसे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. आयपीएल 2024 मध्ये कोणता खेळाडू कोणत्या संघाकडून खेळणार हे निच्छित झाले असून, आता सर्वच संघांनी तयारी देखील सुरु केली आहे. आयपीएलचा 17 वा हंगाम येत्या मार्च पासून सुरु होणार असून अद्याप त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

भारताची देशांतर्गत फ्रँचायझी लीग आयपीएल (IPL ) जितकी आकर्षक आहे तितकीच ती रोमांचकही आहे. जगातील सर्व देशांतील मोठे खेळाडू यात सहभागी होतात. प्रत्येकजण आपापल्या फ्रँचायझींसाठी सर्वोत्तम देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतो.

आयपीएलमध्ये बॉल आणि बॅटमध्ये मोठी स्पर्धा असते, ज्यामध्ये एकीकडे फलंदाज प्रत्येक चेंडूला सीमापार पाठवताना दिसतो, तर दुसरीकडे गोलंदाज सर्व चेंडूंवर विकेट शोधत राहतो. या स्पर्धेत जेव्हा दोन संघ आमनेसामने येतात तेव्हा मैदानावर षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो, ज्याचा चाहत्यांना खूप आनंद होतो.

तर, या लेखात आम्ही तुम्हाला त्या 3 फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत,ज्यांनी आतापर्यंत आयपीएलमध्ये एका षटकात 3 किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू..

IPL 2024 TITLE SPONSER : टाटा आणि बिर्ला ग्रुपमध्ये मोठी टक्कर, वाचा शेवटी कुणाला मिळाले शीर्षक प्रायोजकचे अधिकार..!

IPL RECORDS : आयपीएलमध्ये एका षटकात ३ पेक्षा जास्त षटकार मारणारे फलंदाज

१- ख्रिस गेल

या यादीत वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. गेलबद्दल सर्वांनाच माहिती आहे की, तो मैदानात उतरला की षटकारांची आतषबाजी केली जाते आणि त्याच्यात सर्वात मोठ्या गोलंदाजाचाही दिवस खराब करण्याची क्षमता आहे.

गेल हा केवळ आयपीएलमध्ये षटकार मारण्याचा बादशाह नाही तर , तो जागतिक क्रिकेटमध्ये षटकार मारण्याच्या ताकदीसाठीही प्रसिद्ध आहे. युनिव्हर्स बॉसने आयपीएलमध्ये आतापर्यंत 140 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 4950 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याच्या बॅटमधून 357 षटकार आणि 404 चौकार लागले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chris Gayle 👑 (@chrisgayle333)

गेल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. याशिवाय त्याने एका ओव्हरमध्ये सर्वाधिक वेळा ३ किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. या यादीत गेल नंबर 1 वर आहे, कारण त्याने 17 वेळा हा पराक्रम केला आहे.

२- किरॉन पोलार्ड

या यादीत वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा कर्णधार किरॉन पोलार्डचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने अलीकडेच T20I क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. पोलार्डकडे ताकदीने चेंडू सीमापार पाठवण्याची क्षमता आहे.

IPL RECORDS: आयपीएलमध्ये 'या' स्फोटक 3 फलंदाजांनी एकाच षटकात ठोकलेत सर्वाधिक षटकार, ख्रिस गेलचा आकडा पाहून बसेल धक्का..!

पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करतो आणि फ्रँचायझीला 5 ट्रॉफी जिंकण्यात मदत करण्यात त्याची मोठी भूमिका आहे कारण जोपर्यंत तो मैदानात आहे तोपर्यंत मुंबई सर्वात कठीण लक्ष्य देखील साध्य करू शकते.

पोलार्डने आयपीएलमध्ये आतापर्यंत 171 सामने खेळले असून त्यात त्याने 3191 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याच्या बॅटमधून 211 षटकार आणि 207 चौकार लागले आहेत. पोलार्ड स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या  स्थानावर आहे. आतापर्यंत त्याने 14 पेक्षा जास्त वेळा 3 किंवा अधिक षटकार मारले आहेत.

3- आंद्रे रसेल

 

View this post on Instagram

 

A post shared by Kolkata Knight Riders (@kkriders)

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करतो. रसेल हा टी-20 फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक आहे, जेव्हा तो लयीत असतो तेव्हा त्याच्यासमोर कोणता गोलंदाज आहे हे महत्त्वाचे नसते, तो फक्त षटकार ठोकून चेंडू सीमारेषेपार पोहचवत असतो.

म्हणूनच या स्फोटक अष्टपैलू खेळाडूचे नाव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रसेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 81 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1680 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 117 चौकार आणि 142 षटकार मारले आहेत. हा आकडा पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की, रसेलच्या बॅटमधून सर्वाधिक धावा फक्त षटकारांच्या जोरावर येतात.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *