IPL Records: संपूर्ण आयपीएल कारकीर्दीमध्ये हे 4 खेळाडू एकही षटकार ठोकू शकले नाहीत, एकाने तर खेळलेत तब्बल 7 हंगाम..

IPL Records: संपूर्ण आयपीएल कारकीर्दीमध्ये हे 4 खेळाडू एकही षटकार ठोकू शकले नाहीत, एकाने तर खेळलेत तब्बल 7 हंगाम..

IPL Records:  इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024)  ची येत्या काही दिवसांत सुरुवात होणार आहे, ज्याबद्दल क्रिकेट चाहते खूप उत्सुक आहेत. बीसीसीआय लवकरच आगामी मोसमाचे वेळापत्रक जाहीर करू शकते. एका अंदाजानुसार येत्या 23 मार्चपासून यंदाच्या आयपीएल हंगामाला सुरवात होऊ शकते. जगभरातील क्रिकेट चाहते आयपीएलचे बिगुल वाजण्याची वाट पाहत असतांना आम्ही आमच्या या ब्लोगच्या माध्यमातून तुम्हाला आयपीएलचे अनेक विक्रम आणि मागील हंगामातील काही रोमांचक्क किस्से सांगत आहोत.

आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अश्या काही खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी आयपीएल हंगामात फलंदाजी तर केली मात्र संपूर्ण कारकिर्दीमध्ये ते एकही षटकार ठोकू शकले नाहीत. हा, वाचून थोडसं आच्छर्य जरूर वाटेल .मात्र हे खरंय.. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू जे आपल्या आयपीएल कारकिर्दीमध्ये एकही षटकार ठोकू शकले नाहीत.

IPL 2024 TITLE SPONSER : टाटा आणि बिर्ला ग्रुपमध्ये मोठी टक्कर, वाचा शेवटी कुणाला मिळाले शीर्षक प्रायोजकचे अधिकार..!

IPL Records: संपूर्ण आयपीएल कारकीर्दीमध्ये एकही षटकार न ठोकू शकलेले 4 खेळाडू

 1:आकाश चोप्रा (Akash Chopra)

आकाश चोप्रा, भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि आता एक प्रसिद्ध समालोचक, अशा काही क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्यांनी  आयपीएलमध्ये एकही षटकार ठोकला नाहीये. आकाश चोप्राने  आयपीएलच्या 3 हंगामात फलंदाजी केली होती.

sddefault

आकाश चोप्रा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्सकडून (RR) क्रिकेट खेळला. या कालावधीत, त्याने आयपीएलमध्ये एकूण 7 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 8.83 च्या सरासरीने आणि 74.64 च्या स्ट्राइक रेटने 53 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आले, पण एकही षटकार नाही.

खरे तर चोप्राची आयपीएल कारकीर्द खूपच लहान होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आकाश चोप्राने केवळ आयपीएलमध्ये षटकारच मारला नाही, तर भारतासाठी 17 आंतरराष्ट्रीय सामने खेळूनदेखील त्याने आपल्या बॅटमधून एकही षटकार मारला नाही.

२: शोएब मलिक (Shoaib Malik)

2008 मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा पाकिस्तानमधील 10 खेळाडूंनी आयपीएलमध्ये भाग घेतला, त्यापैकी एक पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक होता. मलिकला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेत त्यांच्या संघात सामील केले होते. मलिकने सात आयपीएल सामने खेळले, 13.00 च्या सरासरीने 52 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 चौकार मारले, मात्र त्याच्या बॅटमधून एकही षटकार लागला नाही.IPL Records: संपूर्ण आयपीएल कारकीर्दीमध्ये हे 4 खेळाडू एकही षटकार ठोकू शकले नाहीत, एकाने तर खेळलेत तब्बल 7 हंगाम..

शोएब मलिकच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून १९१ षटकार ठोकले आहेत.

3: नितीन सैनी (Nitin Saini)

हरियाणाचा यष्टिरक्षक-फलंदाज नितीन सैनी हा देखील अशा फलंदाजांपैकी एक आहे, ज्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एकही षटकार मारला नाही. पंजाब किंग्सने (किंग्ज इलेव्हन पंजाब) या खेळाडूला  विकत घेतले आणि 2012 मध्ये त्याला संघात समाविष्ट केले  होते.

त्या हंगामात नितीनने पंजाबसाठी 10 सामने खेळले, 14.00 च्या सरासरीने 99.29 च्या स्ट्राइक रेटने 140 धावा केल्या. यादरम्यान त्याने 16 चौकार मारले, मात्र त्याच्या बॅटमधून एकही षटकार लागला नाही. त्यानंतर हा खेळाडू पुन्हा कधीही आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही.

मात्र तरीही तो त्याच्या घरच्या हरियाणा संघाकडून खेळताना दिसतो. त्याने देशांतर्गत स्तरावर आपल्या बॅटने 43 षटकार ठोकले आहेत.

4: इशांक जग्गी (Ishank Jaggi)

या यादीत झाखंडचा उजवा हाताचा फलंदाज इशांक जग्गीचेही नाव आहे. जग्गीने वर नमूद केलेल्या तीन खेळाडूंपेक्षा जास्त हंगामात आयपीएल खेळला, परंतु तरीही त्याला एकही षटकार मारता आला नाही.

होय, इशांक जग्गी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून तीन हंगामात क्रिकेट खेळला. एकूणच, या खेळाडूने तीन हंगामात 7 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 78.35 च्या स्ट्राइक रेटने आणि 15.20 च्या सरासरीने 76 धावा केल्या.

IPL Records: संपूर्ण आयपीएल कारकीर्दीमध्ये हे 4 खेळाडू एकही षटकार ठोकू शकले नाहीत, एकाने तर खेळलेत तब्बल 7 हंगाम..

यादरम्यान फलंदाजाने काही चौकार मारले. त्याच्या बॅटमधून फक्त 6 चौकार आले आणि षटकारांचा स्तंभ रिकामा राहिला कारण त्याला एकही षटकार मारता आला नाही. हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्या स्पर्धेत नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो, या निवडक फलंदाजांना एकही षटकार मारता आला नाही.

तर मित्रांनो, हे होते ते 4 फलंदाज ज्यांनी आयपीएल कारीकीर्दीमध्ये एकही षटकार ठोकला नाहीये. वरील खेळाडूंपैकी सर्वांत लहान कारकिर्दही आकाश चोप्राची होती. क्रिकेटचे असेच विक्रम आणि अनोखी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या,आणि वाचत रहा युवाकट्टा..


हेही वाचा:

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *