IPL teams owners net worth: मुंबई इंडियन्स नाही तर आयपीएल मधील ‘या’ संघाचा मालक आहे सर्वांत श्रीमंत , एकूण कमाई आहे अंबानी पेक्षा दुप्पट..!

0
3

IPL teams owners net worth:   जगभरातील क्रिकेट चाहत्यांची नजर भारतावर आहे. भारतात इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे. हा सर्वात लोकप्रिय आणि मौल्यवान खेळांपैकी एक आहे. भारतीय खेळाडूंसोबतच परदेशी खेळाडूही मोठी कमाई करत आहेत. त्याचबरोबर आयपीएल संघांच्या मालकांची कमाईही वाढत आहे.

आयपीएल संघांच्या मालकांमध्ये अनेक बडे उद्योगपती आणि मनोरंजन जगतातील व्यक्तींची नावे आहेत. IPL संघांच्या सर्वात श्रीमंत मालकांच्या यादीत नीता अंबानीपासून ते शाहरुख खान आणि प्रीती झिंटा ते एन श्रीनिवास आणि काव्या मारनपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहित आहे का की 10 आयपीएल संघांच्या मालकांमध्ये सर्वात श्रीमंत आणि सर्वात जास्त संपत्ती कोण आहे, तर सर्वात कमी श्रीमंत आयपीएल संघाचा मालक कोण आहे? आयपीएल 2024 संघांच्या मालकांच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

IPL 2024: आयपीएलचा अंतिम सामना या मैदानावर होणार; लवकरच होणार घोषणा..!

आयपीएल संघ आणि त्याचे मालक (IPL Teams & Their owners)

  • मुंबई इंडियन्स- नीता अंबानी आणि आकाश अंबानी
  • चेन्नई सुपर किंग्ज – एन श्रीनिवासन
  • कोलकाता नाइट रायडर्स- शाहरुख खान, जुही चावला आणि जय मेहता
  • सनरायझर्स हैदराबाद- काव्या मारन
  • दिल्ली केपीटल्स पार्थ जिंदाल (जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुप)
  • राजस्थान रॉयल्स- मनोज बादले आणि लचलान मर्डोक
  • पंजाब किंग्स- प्रीती झिंटा, नेस वाडिया, मोहित बर्मन आणि करण पाल
  • लखनौ सुपर जायंट्स- संजीव गोयंका
  • गुजरात टायटन्स- स्टीव्ह कोल्ट्स, डोनाल्ड मॅकेन्झी
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर- युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड

आयपीएल संघांच्या सर्वात श्रीमंत मालकांमध्ये मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत. मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू 9,962 कोटी रुपये आहे. कमी संपत्ती असलेला संघ गुजरात टायटन्स आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू 6000 कोटी रुपये आहे. या संघाचे मालक स्टीव्ह कोल्ट्स आणि डोनाल्ड मॅकेन्झी आहेत.

IPL teams owners net worth:  मुंबई इंडियन्स नाही तर आयपीएल मधील 'या' संघाचा मालक आहे सर्वांत श्रीमंत , एकूण कमाई आहे अंबानी पेक्षा दुप्पट..!

आयपीएल संघ मालकांची निव्वळ संपत्ती (IPL teams owners net worth)

मुंबई इंडियन्स हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या नेतृत्वाखालील संघ आहे. नीता अंबानी यांच्याकडे जवळपास 23,199 कोटी रुपयांची संपत्ती (Nita Ambani Net Worth)  आहे. (Mumbai indian team owner net worth)

दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज आहे, ज्याचे मालक इंडिया सिमेंट्सचे एन श्रीनिवासन आहेत. पाचवेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जची ब्रँड व्हॅल्यू 8,811 कोटी रुपये आहे. तर एन श्रीनिवासन हे सुमारे ७२० कोटी रुपयांच्या एकूण मालमत्तेचे मालक (N. Srinivasan Net Worth) आहेत. (Chennai Super Kings owner net worth)

शाहरुख खानची कंपनी रेड चिली एंटरटेनमेंट ही कोलकाता नाईट रायडर्सची मालकीण आहे. त्यांच्यासोबत जुही चावला आणि जय मेहता यांचेही पैसे कोलकाता नाईट रायडर्स संघात गुंतवले आहेत. या संघाची ब्रँड व्हॅल्यू 8,428 कोटी रुपये आहे. तर शाहरुखची संपत्ती (Shahrukh Khan Net Worth) 6000 कोटींहून अधिक आहे.(Kolkata Knight Riders owners Net Worth)

सन टीव्ही नेटवर्कच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद कंपनीच्या सीईओ काव्या मारन यांच्या मालकीची आहे. काव्या मारन ही सन ग्रुपच्या संस्थापक कलानिती मारन यांची मुलगी आहे. सनरायझर्स हैदराबादची ब्रँड व्हॅल्यू 7,432 कोटी रुपये आहे आणि काव्याची संपत्ती सुमारे (Kavya Maran Net worth) 409 कोटी रुपये आहे. (Sunrisers Hyderabad Owner net worth)

GMR ग्रुप आणि JSW ग्रुप हे दिल्ली कॅपिटलचे एकत्रित मालक आहेत पार्थ जिंदाल. पार्थ जिंदाल जवळपास ६०० कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीचा मालक (Parth Jindal Net Worth) आहे. संघाची ब्रँड व्हॅल्यू 7,930 कोटी रुपये आहे. (Delhi Capital Owner Net Worth)

IPL teams owners net worth:  मुंबई इंडियन्स नाही तर आयपीएल मधील 'या' संघाचा मालक आहे सर्वांत श्रीमंत , एकूण कमाई आहे अंबानी पेक्षा दुप्पट..!

रॉयल मल्टी स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही राजस्थान रॉयल्सची मालकी आहे. मनोज बदाले आणि लचलान मर्डोक हे संघ मालक आहेत. मनोज बडाले यांची एकूण संपत्ती $160 दशलक्ष (Manoj Badale Net Worth) असल्याचे सांगितले जाते. तर राजस्थान रॉयल्सची ब्रँड व्हॅल्यू 7,662 (Rajasthan r कोटी रुपये आहे.

प्रीती झिंटाच्या मालकीच्या आयपीएल संघ पंजाब किंग्जचे सह-मालक मोहित बर्मन, नेस वाडिया आणि करण पाल देखील आहेत. पंजाब किंग्जची ब्रँड व्हॅल्यू 7,087 कोटी रुपये आहे. प्रीती झिंटाची जवळपास 183 कोटींची संपत्ती आहे.

लखनौ सुपरजायंट्स RPSG व्हेंचर्स लिमिटेडच्या मालकीची आहे. या कंपनीचे मालक उद्योगपती संजीव गोयंका आहेत. त्यांची एकूण संपत्ती 26,800 कोटी रुपये आहे. संघाची ब्रँड व्हॅल्यू 8,236 कोटी रुपये आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मालकीचे आहे. या संघाची ब्रँड व्हॅल्यू 7,853 कोटी रुपये आहे.

गुजरात टायटन्स हा स्टीव्ह कोल्ट्स आणि डोनाल्ड मांझी यांच्या मालकीचा CVC कॅपिटल्सच्या नेतृत्वाखालील संघ आहे. या टीमची ब्रँड व्हॅल्यू  (Gujrat Titans team Net  Value) 6,512 कोटी रुपये आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :  फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

ऑरेंज आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती रक्कम दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..

Viral video: कोलकत्ता नाईट रायडर्सच्या बालेकिल्ल्यात जॉस बटलरचा धमाका, ठोकले IPL मधली मधील सातवे धडाकेबाज शतक, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here