- Advertisement -

चेन्नईवर दोन वर्षाची बंदी ते हरभजनने श्रीशांतला लगावलेली थप्पड..! आयपीएलमधील हे 5 वादग्रस्त प्रकरणे आजपर्यंत कुणीही विसरू शकले नाहीये..

0 10

चेन्नईवर दोन वर्षाची बंदी ते हरभजनने श्रीशांतला लगावलेली थप्पड..! आयपीएलमधील हे 5 वादग्रस्त प्रकरणे आजपर्यंत कुणीही विसरू शकले नाहीये..


IPL Top 5 controversy: इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात महाग आणि सर्वात लोकप्रिय टी20 लीग आहे. या लीगचा थरार असा आहे की, जिथे क्रिकेट खेळणाऱ्या जगातील प्रत्येक खेळाडूला याचा भाग व्हायचे असते, तर क्रिकेटचे चाहते वर्षभर या लीगची वाट पाहत असतात.

याचे कारण म्हणजे , आयपीएल (IPL)लीगमधील सामन्यांदरम्यान खेळाडूंनी कधीही न पाहिलेली किंवा खेळाडूंनी कधीही न केलेली कामगिरी पाहायला मिळते. पण क्रिकेट आणि वाद यांचे जुने नाते आहे हे तुम्हाला माहीत आहेच. आयपीएल देखील वादापासून अस्पर्श राहिलेला नाही. 2008 मध्ये सुरू झालेल्या या लीगच्या 5 मोठ्या वादांबद्दल (IPL Top 5 controversy) आज आपण या लेखाद्वारे सविस्तर जाणून घेणार आहोत..

वाद

१.हरभजनने श्रीशांतला थप्पड मारली (Harbhajan Singh Shrishant IPL Controversy)

ही घटना IPL च्या पहिल्या आवृत्तीची म्हणजेच IPL 2008 ची आहे. मुंबई इंडियन्स(mi) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (PBKS) यांच्यातील सामन्यात मुंबई इंडियन्सचा खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh)ने किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू श्रीशांतला(Shrishant) थप्पड मारली.

सादरीकरण सोहळ्यापूर्वी श्रीशांत जमिनीवर रडताना दिसला. या घटनेवरून बराच वाद झाला होता. हरभजनवर उर्वरित स्पर्धेत बंदी घालण्यात आली होती आणि हरभजन सिंग दोषी आढळल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्याचे वेतन रोखले होते. बीसीसीआयने भज्जीवर पाच एकदिवसीय सामन्यांची बंदीही घातलीगेली होती. आयपीएलच्या या वादाने सोशल मिडियासह सगळीकडेच चांगलेच मैदान गाजवले होते.

आता हा वाद मिटला असला तरीदेखील चाहते आजूनही हा प्रंसग विसरले नाहीयेत. 2023 मध्ये याच वादाची पार्श्वभूमी घेऊन हरभजन आणि श्रीशांतने एक जाहिरात सुद्धा केली आहे. Zomato कंपनीने या दोघांना घेऊन एक जाहिरात चित्रित केली आहे जी लवकरच प्रदर्शित होऊ शकते.

 वाद

२.आयपीएलचे अध्यक्ष लंडनला पळून गेले(IPL president fled to London)

ललित मोदी (Lalit Modi) हे आयपीएलचे मास्टर माईंड मानले जात होते. ते आयपीएलचे पहिले अध्यक्ष आणि आयुक्त होते. आयपीएल दरम्यान, त्याच्यावर अनुचित वर्तन अनुशासनहीनता आणि आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला, त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले.

बीसीसीआयच्या तपासात मोदींवरील सर्व आरोप खरे ठरले आणि 2013 मध्ये त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्याविरुद्ध तपास सुरू करण्यापूर्वीच ललित मोदी (Lalit Modi) आपल्यावर लावलेले सर्व आरोप नाकारत राहिले आणि लंडनला पळून गेले. मोदी अजूनही लंडनमध्ये राहतात.

3.शाहरुखवर ५ वर्षांची बंदी घालण्यात आली होती (Shahrukh Khan was banned for 5 years At Wankhede Stadium)

आयपीएलचा मोठा वाद बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानशी (Shahrukh Khan)ही संबंधित आहे. वास्तविक, शाहरुख आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चा सह-मालक आहे. त्यामुळे केकेआरच्या सामन्यांदरम्यान संघाला पाठिंबा देण्यासाठी ते विशेषत: मुंबईत उपस्थित असायचा.

मुंबईतच झालेल्या एका सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमच्या अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप शाहरुखवर(Shahrukh Khan) करण्यात आला होता. यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) शाहरुखवर वानखेडेवर प्रवेश करण्यासाठी पाच वर्षांची बंदी घातली. रिपोर्ट्सनुसार, शाहरुखचा एका गार्डसोबत वाद झाला आणि त्याने त्याच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप होता.

किंग खानवरील  ही बंदी आता उठवण्यात आली असून शाहरुखला सामने पाहण्यासाठी वानखेडेवर परवानगी दिली गेली आहे. मात्र शाहरुखचे चाहते आजूनही हा वाद विसरले नाही आहेत.

४.आयपीएलवरही स्पॉट फिक्सिंगचा डाग पडला होता. (Spot Fixing In ipl)

सर्वात महागडी लीग मानली जाणारी आणि ज्यामध्ये खेळाडूंना इतर लीगपेक्षा जास्त पैसे मिळतात, त्या आयपीएल (IPL)वरही स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) चे डाग लागले आहेत. 2013 मध्ये दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) चे तीन खेळाडू एस श्रीशांत (S. shrishant), अजित चंडिला (Ajit Chandila) आणि अंकित चव्हाण (Ankit Chavan) यांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. या घटनेने क्रिकेट जगतात भूकंप झाला होता.

 वाद

या संदर्भात मुंबई पोलिसांनी विंदू दारा सिंग आणि सीएसकेचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.के. श्रीनिवासन आणि त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पन यांना सट्टेबाजी आणि सट्टेबाजांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. राज कुंद्राचे नाव स्पॉट फिक्सिंगमध्येही आले होते. 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (csk)ला दोन वर्षांसाठी निलंबित केले होते. 2018 मध्ये हे दोन्ही संघ पुन्हा आयपीएलमध्ये परतले होते.

५.मंकडिंग वाद (Mankding Controversy)

 वाद

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये मँकाडिंगबाबत अनेक वाद निर्माण झाले आहेत, जे मथळे बनले आहेत. आयपीएल देखील मंकडिंगपासून अस्पर्श राहिलेला नाही. आयपीएल 2019 मध्ये मॅनकेडिंगचा वाद प्रकाशझोतात आला जेव्हा पंजाबचा (pbks) कर्णधार रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)ने राजस्थानच्या जोस बटलर (JOS Buttler)ला मॅनकेडिंग करताना बाद केले. बटलरच्या बाद झाल्यामुळे ‘स्पिरिट ऑफ द गेम’वर वादाची ठिणगी पडली आणि क्रिकेट विश्व दोन भागात विभागले गेले, पण त्यानंतर नियम अश्विनच्या बाजूने गेले, त्यामुळे प्रकरण शांत झाले.


हेही वाचा:

विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..

Ms धोनी चे फार्महाऊस बघितले तर घालाल तोंडात बोटं, फार्म हाऊस ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.

घरच्या मैदानात ऑस्ट्रोलीयाचा तब्बल 89 धावांनी पराभव,मानहानीकारक पराभवानंतर अॅरॉन फिंचचे फोडले या खेळाडूंवर पराभवाचे खापर..

IND vs NED: टोस जिंकून कर्णधार रोहित शर्माने घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय, संघात केलेत हे 3 मोठे बदल..

Leave A Reply

Your email address will not be published.