IPL 2024: आयपीएलचे हे आहेत 5 अतूट विक्रम, जे मोडणे अवघडच नाही तर अशक्य आहे.

Cricket 2

 

 

 

एका डावात सर्वाधिक धावा करणारा संघ:-

दर वर्षी आयपीएल मध्ये वेगवेगळे रेकॉर्ड बनतात किंवा तुटतात परंतु एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा हा रेकॉर्ड अशक्य आहे. आयपीएल 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पुणे वॉरियर्स हा सामना झाला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने एका डावात 276 धावा काढल्या होत्या याचबरोबर आयपीएल च्या इतिहासातील सर्वात कमी स्कोअर करणारा संघ सुद्धा बेंगलोर च आहे. अवघ्या 49 धावांत संपूर्ण संघ बाद झाला होता.

Cricket 2

 

एका डावात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज:-

आयपीएल च्या पुणे vs रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या सामन्यात आरसीबीने २६३ धावा करण्याचा विश्वविक्रम केला होता. याच सामन्यात आरसीबीचा माजी फलंदाज ख्रिस गेलने १७५ धावांची उत्कृष्ट खेळी केली. आजपर्यंत एका डावात एवढ्या धावा कोणीच करू शकले नाही.

 

 

आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार लावणारा फलंदाज:- आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम क्रिस गेल च्या नावी होता. क्रिस गेल ने आतापर्यंत आयपीएल मध्ये 357 षटकार मारले आहेत. याच्या मागे रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएल मध्ये 257 षटकार मारले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एबी डिव्हिलियर्सने आतापर्यंत आयपीएल मध्ये 251 षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये एमएस धोनीने 239 षटकार तर विराट कोहलीने 234 षटकार मारले आहेत.

 

आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा:-

विराट कोहलीने IPL 2016 मध्ये चांगली कामगिरी केली होती. या संपूर्ण मोसमात त्याने चार शतके झळकावली. यासह त्या मोसमात विराट च्या नावावर ९७३ धावांची नोंद झाली आहे. आयपीएलच्या एका मोसमातील खेळाडूने आतापर्यंत केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. हे रेकॉर्ड आजपर्यंत कोणीच मोडू शकले नाही.

 

 

आयपीएलच्या सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेले खेळाडू:-

आयपीएल च्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामन्यात संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी ने केले आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये 226 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. तर दुसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा ने 158 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. या नंतर तिसऱ्या स्थानी विराट कोहली आहे बरेच वरचे विराट कडे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाचे कर्णधारपद होते.

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हे ही वाचा:- BCCI Annual Contract: बीसीसीआई ने या 5 दिग्गज खेळाडूंना कॉन्ट्रॅक्ट मधून वगळले, क्रिकेट करियर वर लागू शकतो कायमचा ब्रेक.

 

 

 

हे ही वाचा:- यह है असली किंग, जे सचिन, सेहवाग, गंभीर ला जमल न्हवत ते या वाघाने केलं, वाचा सविस्तर.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *