कारीकीर्दीच्या सुरवातीच्या काळात आयपीएलच्या लिलावात विकल्या गेले नव्हते हे 3 स्टार खेळाडू, आज आहेत आयपीएलचे बादशहा..

0
5

IPL Unsold Players:  क्रिकेट जगतातील सर्वात मोठी लीग असलेली इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2024 येत्या मार्च महिन्यापासून सुरु होत आहे. त्याआधी लिलावादरम्यान अनेक खेळाडूंचे नशीब बदलते. यंदाच्या लिलावात ऑस्ट्रोलीयन खेळाडूंनी जबरदस्त बोली मिळवत नवे विक्रम रचले.

शिवाय याच लीलावत अनेक दिग्गज खेळाडू असून सुद्धा त्यांच्यावर बोली लागली नाही. जे दिग्गज खेळाडू असून देखील त्यांचे आयपीएल करिअर आता संपल्यात जमा झालेय.

आयपीएलमध्ये असे अनेकदा घडले आहे. जेव्हा आयपीएल लिलावादरम्यान खेळाडूला कोणताही खरेदीदार सापडला नाही. पण नंतरपुढील हंगामात जेव्हा तो या लीगमध्ये खेळला तेव्हा सर्व संघांनी त्याला लिलावात न घेतल्याबद्दल नक्कीच खेद व्यक्त केला.

IPL 2024 TITLE SPONSER : टाटा आणि बिर्ला ग्रुपमध्ये मोठी टक्कर, वाचा शेवटी कुणाला मिळाले शीर्षक प्रायोजकचे अधिकार..!

आज आम्ही तुम्हाला अशाच 3 दिग्गजांबद्दल सांगणार आहोत. जे आयपीएल च्या पहिल्या लिलावात विकले गेले नव्हते मात्र, नंतर संधी मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःला सिद्ध केले आणि आयपीएलमध्ये एक मोठ नाव कमावल..

आयपीएलमध्ये पहिल्या लिलावात बोली न लागलेले हे खेळाडू नंतर ठरले हिरो.

 ख्रिस गेल

आयपीएल लिलावात ख्रिस गेलसारखा दिग्गजही विकला गेला नाही हे, फार कमी चाहत्यांना माहीत असेल. सुरुवातीचे काही सीझन कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळल्यानंतर तो आयपीएल 2011 च्या लिलावात उतरला होता जिथे त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.

IPL: 'Only three players got all the attention' – Chris Gayle's shocking revelation on RCB's title drought | Cricket Times

ख्रिस गेल विकला न गेल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. मात्र, नशिबाने त्याला साथ दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज डर्क नेनिस जखमी झाला. त्याच्या जागी बंगळुरू संघाने ख्रिस गेलचा समावेश केला. यानंतर मात्र त्याने पुढे इतिहास बनला. त्या मोसमात त्याने 608 धावा केल्या होत्या.

त्यानंतरही गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी अनेक सत्रात भरपूर धावा केल्या. त्याने एकट्याने बंगळुरूला सामना जिंकून दिला. त्यामुळे त्यांचे नाव या यादीत सामील झाले आहे. आता  गेलची आयपीएल कारकिर्द संपली आहे आणि तो निवृत्तीचा आनंद उचलत आहे.

हार्दिक पंड्या

या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू हार्दिक पांड्याचे नाव देखील सामील आहे. आज त्याला आयपीएलचा सर्वांत मोठा स्टार बनला आहे.  पण आयपीएल 2014 च्या लिलावात  त्याला एकाही संघाने विकत घेतले नव्हते.  या हंगामात तो न विकल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत होता.

"कर्णधार करत असणार तरच.." मुंबई इंडियन्समध्ये येण्याआधीच हार्दिक पंड्याने घातल्या होत्या मालकाला आय अटी, स्वतः संघाच्या

नंतर IPL 2015 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने त्याला विकत घेतल्यावर हार्दिक पांड्याचे नशीब चमकले. तेव्हापासून हार्दिक चे करीअर जबरदस्त सुरु आहे. आता तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार देखील बनला आहे.पांड्या हा आज मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताचा महत्त्वाचा खेळाडू आहे. तो अजूनही आयपीएलमध्ये त्याच संघाकडून खेळतो.

कारीकीर्दीच्या सुरवातीच्या काळात आयपीएलच्या लिलावात विकल्या गेले नव्हते हे 3 स्टार खेळाडू, आज आहेत आयपीएलचे बादशहा..

स्टीव्ह स्मिथ

आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन फ्रँचायझींचे नेतृत्व करणाऱ्या अनुभवी स्टीव्ह स्मिथला लिलावादरम्यान कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. तो आयपीएल 2012 च्या लिलावाचा भाग होता. पण तेथे कोणत्याही फ्रँचायझीने या खेळाडूचा त्यांच्यासोबत समावेश केला नाही. स्टीव्ह स्मिथचे नशीब त्याच्या बाजूने होते.

त्या आयपीएल मोसमात सहारा पुणे वॉरियर्सचा खेळाडू मिचेल मार्श दुखापतीमुळे बाहेर असताना पुण्याने स्टीव्ह स्मिथला जोडले. त्या IPL 2012 मध्ये स्टीव्ह स्मिथने 362 धावा केल्या होत्या.

Steve Smith IPL 2024 Team, Price, Salary, Career Stats & Records

त्यानंतर स्मिथने आयपीएलमध्ये मागे वळून पाहिले नाही. सहारा पुणे वॉरियर्स, रायझिंग पुणे सुपरजायंट यांसारख्या संघांचे नेतृत्वही केले आहे. स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्स संघाशीही जोडला गेला. यंदाच्या लिलावात स्मिथला कोणत्याही संघाने बोली लावून आपल्यात सामील करून न घेतल्यामुळे तो आता आयपीएलमधून बाहेर आहे. आणी त्याची आयपीएल  कारकीर्द जवळपास संपल्यात जमा झाली आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here