- Advertisement -

“नो मुंबई, नो चेन्नई” IPL 2023 मध्ये हा संघ चॅम्पियन बनण्याची शक्यता, ही आहेत 4 मोठी कारणे.

0 2

 

 

क्रिकेट हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशातून सर्वाधिक पसंती क्रिकेट खेळाला मिळत आहे. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे. आजपासून आपल्या भारतात T20 आयपीएल सुरू होणार असल्याने अनेक तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या संघाबद्दल सांगणार आहे जो संघ 2023 ला आयपीएल चॅम्पियन बनेल.

 

आजपासून सुरू होणाऱ्या आयपीएल च्या 16 व्या सिझन मध्ये 10 संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत परंतु यंदा चा आयपीएल विजेता तसेच ट्रॉफी चा प्रबळ दावेदार या संघाला मानले जाते.

 

यंदा च्या आयपीएल सिझन मध्ये सनरायझर्स हैदराबाद हा संघ चॅम्पियन बनू शकतो. याच्या आधी सुद्धा हैद्राबाद संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती परंतु यंदा च्या वर्षी हैद्राबाद संघ हा अत्यंत मजबूत दिसत आहे.

 

 

यंदा च्या वर्षी हैदराबाद संघाचे नेतृत्व हे एडन मार्कराम करणार आहे, एडन मार्कराम च्या नेतृत्वाखाली सनरायझर्स इस्टर्न केप संघाने अलीकडेच प्रथमच आयोजित केलेली SA20 लीग मध्ये सुद्धा विजेतेपद जिंकले आहे.

 

 

यंदा हैदराबाद संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आणि अत्यंत आक्रमक फलंदाज संघामध्ये आहेत. या संघात मयंक अग्रवाल आणि हॅरी ब्रूकसारखे खेळाडूही आहेत. त्यामुळे या संघाची मधली श्रेणी चांगली आहे. गोलंदाजी आक्रमणाबद्दल सांगायचे झाले तर, गोलंदाजी साठी या संघात उमरान मलिक, मार्को जॅनसेन, टी. नटराजन आणि कार्तिक त्यागी सारखे दिग्गज गोलंदाज आहेत आणि त्यामुळेच यंदा च्या वर्षी हैद्राबाद हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.