आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाने गुजरातचा हिरावून घेतला विजयाचा घास! वाचा शशांक सिंहची कहाणी…

0
18
आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाने गुजरातचा हिरावून घेतला विजयाचा घास! वाचा शशांक सिंहची कहाणी...
ad

 शशांक सिंह: आयपीएल 2024 मधील 17वा सामना गुजरात टायटन्स आणि किंग्स पंजाब संघात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सने शानदार विजय मिळवला. पंजाब कडून सर्वाधिक चर्चेत राहिला तो खेळाडू म्हणजे शशांक सिंह. शशांक सिंहने नाबाद अर्धशतकी खेळी करत गुजरातच्या विजयावर पाणी फेरले. आयपीएल ऑक्शनमध्ये शशांक याला खरेदी केल्यानंतर पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटाला पश्चाताप होत होता. पण याच खेळाडूंनी पंजाबच्या संघाला एक मोठा विजय मिळवून दिला.

IPL 2024: पंजाब किंग्स को मैच जिताने के बाद शशांक सिंह ने इस टीम पर बड़े  सवाल खड़े कर दिए | Shashank Singh big statement after pbks beat gt ipl 2024  latest

संघाचा कर्णधार शिखर धवन आणि धडाकेबाज फलंदाज जॉनी बेयरस्टो हे बाद झाल्यानंतर पंजाब पराभवाच्या अवस्थेत होता. अशा परिस्थितीमध्ये शशांकने अर्धशतकी खेळी करत संघाला तीन गडी राखून विजय मिळवून दिला. पंजाब किंग्सची मालकीण प्रीती झिंटा आयपीएल 2023 मध्ये झालेल्या मिनी ऑप्शन मध्ये शशांक सिंग याला परत करणार होती. मात्र तसे झाले नसल्याने त्याला संघात कायम ठेवावे लागले. पंजाबने शशांक सिंह याला वीस लाख रुपयांच्या बेस्ट प्राईस मध्ये खरेदी करून आपल्या संघात ठेवले. त्याने अवघ्या 29 चेंडू चार षटकार आणि सहा चौकार मारत नाबाद 61 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

पंजाब किंग्स संघाकडून शशांक सिंह यांच्याशिवाय इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात फलंदाजी करण्यासाठी उतरलेला आशुतोष शर्मा याने देखील सामन्यात इम्पॅक्ट टाकला. आशुतोषने 17 चेंडू तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने छोटेखानी खेळी करत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सलग दोन पराभवानंतर पंजाबने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत जबरदस्त पुनरागमन केले.

आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाने गुजरातचा हिरावून घेतला विजयाचा घास! वाचा शशांक सिंहची कहाणी...

शशांकचे वय 32 वर्ष असून त्याने आयपीएल 2022 मध्ये पदार्पण केले होते. त्याला 2019 मध्ये आयपीएल मध्ये एंट्री मिळाली पंजाबच्या पूर्वी शशांक सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य राहिला आहे. त्याचा जन्म 21 नोव्हेंबर 1991 मध्ये झाला होता. शशांक सिंह याचे वडील शैलेश सिंह आयपीएस अधिकारी आहे. त्यामुळे तो लहानपणापासून वेगवेगळ्या मैदानावर क्रिकेटचे धडे गिरवतोय.

शशांक सिंह याने टी-20 करिअरमध्ये 59 सामने खेळले असून त्यात 815 धावा केल्या आहेत. यासह त्याच्या नावे पंधरा विकेट घेतल्याची देखील नोंद आहे. लिस्ट ए च्या 30 सामन्यात 986 धावांची नोंद आहे. यासह 33 विकेट देखील त्यांनी घेतले आहेत. फर्स्ट क्लास करियर मध्ये 858 धावा केल्या आहेत तर त्यात 12 विकेट घेतल्याची नोंद आहे. विजय हजारे ट्रॉफी 2023 मध्ये शशांकने एका सामन्यात दीडशे धावा आणि पाच विकेट घेतले होते. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

IPL 2024: यॉर्कर स्पेशालिस्ट ‘जसप्रीत बुमराह’ आयपीएलसाठी पूर्णपणे फिट; यंदाच्या आयपीएल मध्ये या तीन विक्रमावर असेल नजर…