6,0,6,4,0,6..बांग्लादेशविरुद्धच्या द्विशतकानंतर रणजी ट्रॉफीमध्येही ईशान किशन घालतोय धुमाकूळ, संजू सॅमसनच्या संघाविरुद्ध कुटल्या एवढ्या धावा..
भारतीय संघाचा युवा खेळाडू ईशान किशन सध्या त्याच्या चांगल्या फोर्ममधून जात आहे. बांग्लादेश विरुद्ध तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात दुहेरी शतक झळकावल्यानंतर किशनवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव झाला. आता तोच फोर्म कायम ठेवत किशन र्रणजी ट्रॉफी खेळत आहे.
नुकतेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनने रणजी ट्रॉफीमध्येही आपला चांगला फॉर्म कायम ठेवला आहे.
झारखंडकडून खेळताना त्याने केरळविरुद्ध 132 धावांची शानदार शतकी खेळी केली आहे. त्याचे हे प्रथम श्रेणीतील कारकिर्दीतील सहावे शतक आहे. या खेळीदरम्यान त्याने सौरभ तिवारीसोबत मोठी भागीदारीही केली आहे.
View this post on Instagram
कशी होती किशनची शतकी खेळी?
झारखंडच्या पहिल्या डावात कर्णधार विराट सिंग 112 धावांवर बाद झाला तेव्हा किशन फलंदाजीला आला. त्याने स्थिर फलंदाजी केली आणि एका बाजूने संघाची कमान संभाळली. त्याला दुसऱ्या टोकाकडून सौरभ तिवारीची चांगली साथ मिळाली. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी २०२ धावांची मोठी भागीदारी केली.
View this post on Instagram
किशनने 195 चेंडूंत नऊ चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 132 धावा केल्या. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील केरळ संघाने अक्षय चंदनच्या शतकाच्या (150) बळावर पहिल्या डावात 475 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
प्रत्युत्तरात झारखंडचा पहिला डाव केवळ 340 धावांवर आटोपला. झारखंडच्या किशनशिवाय सौरभने चांगली फलंदाजी केली. तो 97 धावांवर बाद झाला आणि त्याचे शतक तीन धावांनी हुकले
पहिल्या डावाच्या जोरावर केरळला 135 धावांची आघाडी मिळाली.
डावखुरा फलंदाज, किशनने 2014 मध्ये आसामविरुद्धच्या रणजी सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 79 डाव खेळले असून जवळपास 40 च्या सरासरीने 2,937 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने 273 च्या सर्वोच्च धावसंख्येसह सहा शतके आणि 16 अर्धशतके केली आहेत.
याशिवाय त्याने विकेटकीपिंगमध्ये 11 स्टंपिंगही केले आहेत.

किशनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द: अलीकडेच किशन एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने 210 धावांची खेळी केली. यष्टिरक्षक फलंदाज किशनने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 477 धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात 589 धावा केल्या आहेत.
त्याला अजून भारताकडून कसोटी खेळायची आहे.
ईशान किशनला भारतीय संघात अजूनही जास्त संधी मिळत नाहीये मात्र संधी मिळताच तो तिचे सोने केल्याशिवाय राहत नाही. हे त्याने ठोकलेल्या द्विशतकावरूनच कळते. येत्या काळात किशन भारतीय ट्वेंटी संघाचा सलामीवीर , यष्टीरक्षक म्हणून आपल्याला खेळतांना दिसू शकतो तर दुसरीकडे एकदिवशीय संघात सुद्धा आपली जागा पक्की करण्याचा निर्णय किशन ने घेतलेला दिसतोय.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..